U-Mumba's star tackler and raider Ajay Chavan expressed his feelings
Pro-Kabaddi league 11 : आमच्याकडे इंटरनॅशनल लेव्हलचे डिफेन्डर आहेत, सुनील आणि परवेश दोन्ही डिफेंडर चांगले आहेत. सोम्बीर हा चांगला खेळाडू आहे. यावेळी चांगले खेळाडू आहेत. दोन्ही कॉर्नरला चांगले खेळाडू आहेत. रिंकू भाई साहब, अमिरमोहम्मद झाफरदानेश हे दर्जेदार डिफेंडर आमच्याकडे आहेत. या प्रौ-कबड्डी स्पर्धेमुळे खेळाडूंना चांगले भवितव्य मिळत आहे. त्याचबरोबर आमचा संघ नक्कीच चांगली कामगिरी करतोय, यावेळेस आम्ही चषक घेऊन जाणार आहे. माझी स्वतःची कामगिरीवर मी लक्ष देऊन आहे. माझा खेळ सुधारण्यासाठी आम्ही आणखी सराव करतोय. असे देखील अजयने नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.
लीग स्पर्धांमुळे खेळाडूंचे भविष्य सुधारतेय
प्रो-कबड्डी लीग स्पर्धांमुळे खेळाडूचा गेम सर्वांना कळतो, त्याच्या खेळाच्या भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. तसेच, त्याचा इन्कम ऑफ सोर्सचा मार्ग मोकळा होतो, जेणेकरून त्याचे जीवन सुधारण्यासाठी मोठी मदत होते. अशा लीग स्पर्धांमुळे अनेक कबड्डीपटूंच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होण्याचे काम केले आहे. होमग्राऊंडचा आम्हाला भरपूर फायदा, पब्लिकचा आम्हाला नक्कीच फायदा होतो. खेळाडूंना चाहत्यांकडून सपोर्ट मिळणे हे खेळाडूंकरिता महत्त्वाचे असते.
एकट्याने फिरवला सामना
नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध पुणे कबड्डी सामन्यात मुंबईच्या संघाने धमाकेदार कामगिरी करीत पुणे संघाला मोठ्या लीडने पराभूत केले. यामध्ये सर्वात मोठी कामगिरी अजय चव्हाणची होती. त्याने एकट्याने सामना फिरवत सामना मुंबईच्या बाजूने केला. पुणेर पलटणला घरच्या मैदानावरच पराभूत व्हावे लागले. मागच्या सामन्यात म्हणजेच 3 डिसेंबर रोजी पुणेरी पलटणला यू- मुम्बाने मोठ्या फरकाने पराभूत करून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करीत आगेकूच केली.
एकट्याने घेतले 12 गुण
यू-मुम्बाकडून अजय चव्हाणने एकट्याने शानदार चढायांच्या जोरावर सर्वाधिक 12 गुण घेत पूर्ण सामना फिरवला. सामन्याला सुरुवात करताना पुणेरी पलटण पुढे होती परंतु नंतर उत्तरार्धात पुण्याचा स्थानिक खेळाडू अजित चव्हाण जो यू-मुम्बाकडून खेळतोय. त्याने चार चढाईतच पलटण संघाला निष्प्रभ केले. अजितच्या या चार चढाईतच यु मुम्बाने आत्मविश्वास मिळविला. उत्तरार्धात पहिल्या पाच मिनिटातच लोण स्विकारावा लागल्यनंतर आलेल्या दडपणातून पलटण संघ बाहेर पडू शकला नाही. सामना संपताना आणखी एक लोण चढवत यु मुम्बाने उत्तरार्धातील आक्रमक खेळाच्या जोरावर शानदार विजय मिळविला.
पुणेरी पलटण देणार यूपी योद्धाज बरोबर झुंज
पुणेरी पलटणला मागील सामन्यात यु-मुम्बाकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. आता आज पुण्याची गाठ यूपी योद्धाज बरोबर असणार आहे. यामध्ये पुण्याचा संघ होमग्राऊंडवर नक्की बाजी मारणार की यूपीचा संघ वरचढ ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील सामन्यात पुण्याला घरच्या मैदानावरच पराभवाची चव चाखावी लागली होती. कालच यूपीने दिल्लीला बरोबरीत रोखले होते. आता पुणेरी पलटण यूपीला रोखणार का, हे आता मैदानावरच ठरणार आहे.
अजित चव्हाणची धमाकेदार खेळी
पुणेरी पलटण यु-मुम्बाने अजित चौहानच्या उत्तरार्धातील तुफानी चढाया आणि सुनिल कुमार, सोमवीरच्या भक्कम बचावाच्या जोरावर प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात मुंबईने घरच्या मैदानावरच पुणेरी पलटणला ४३-२९ असे सहज हरवले होते. या सामन्यात अजय चव्हाण स्टार ठरला होता. त्याने एकट्याने हा सामना मुंबईच्या बाजून आणला होता.
पुणेरी पलटणला घरच्या मैदानावर यशस्वी सुरुवात करण्यात अपयश आले. सामन्याची सुरुवात पुणेरी पलटणने शानदार केली, परंतु, या गुणांचे सातत्य त्यांना राखता आले नाही. या विजयाने यु मुम्बाने तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली. मध्यंतराला मिळवलेली १९-१६ अशी आघाडी टिकविण्यात पुणेरी पलटणला मोठे अपयश आले. उत्तरार्धात अजित चव्हाणने चढाईत सुपर टेन करताना १२ गुणांची कमाई केली. अखेरीस पुण्याला ४३-२९ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.