गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगली- पेठ रस्ता रोको आंदोलन
पडळकर यांच्या निषेधार्थ इस्लामपूर शहर बंद ठेवण्यात आले
राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा
इस्लामपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगली- पेठ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच पडळकर यांच्या निषेधार्थ इस्लामपूर शहर बंद ठेवण्यात आले. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा. राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा अध्यक्ष सुष्मिता जाधव,महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, आनंदराव पाटील, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात, यांच्यासह विविध संस्थाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले,” आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. महाराष्ट्रात अशा वाचाळवीर आमदारांच्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन होत आहे. या आंदोलनास वेगळे वळन लागल्यास सर्व जबाबदारी मुख्यमंत्री यांची असणार आहे. यांची शासनाने नोंद घ्यावी.”
जिल्हा अध्यक्षा सुष्मिता जाधव म्हणाल्या,” वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत. आमच्या नेत्यांवर आरोप करण्याची यांची लायकी नाही.” माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले,” वाळवा तालुका लोकनेते राजारामबापू पाटील यांना दैवत मानतात. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात हा आमदार आक्रमक आहे. आक्रमक असेल तो तुमचा आहे. त्याने आमदार जयंत पाटील यांची माफ मागावी.”
सुनिता देशमाने म्हणाल्या,” लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील या जिल्ह्याच्या विठ्ठल रुक्मिणी आहेत. अण्णाजी पंताच्या तुकड्यावर पाळला आहे. या आमदाराने समाजाचा विचार केला का? हा फक्त माजीमंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्यावर भुंकण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यात याला फिरुन देणार नाही. ” अविनाश खरात म्हणाले,” लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अठरा पगड जातीसाठी काम केले आहे. आमदार आमच्या समाजाल लागलेला कलंक आहे.”
आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; महिला पदाधिकाऱ्यांनी भरला दम
शंकरराव चव्हाण म्हणाले,” आमच्या समाजातील अभियंत्यावर दबाव आणला. कोठ्यावधी रुपयांची बिले काढली. या अभियंत्याचा घातपात झाला आहे. आमदार जयंतराव पाटील यांची माफी मागत नाही. तोपर्यंत आंदोलन चालू ठेवले जाईल. यावेळी शैलेश सुर्यवंशी, महेश पाटील, पै. भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे मुनीर पटवेकर, अरुण कांबळे, पुष्पलता खरात, अशोक वाटेगावकर, रोझा किणीकर, शैलेश पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा तिव्र निषेध व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, कार्तिक पाटील, दिपक पाटील, राजेश पाटील, रणजित गायकवाड, विशाल सुर्यवंशी, विशाल माने, एम. जी. पाटील, लालासाहेब अनुसे, सचिन कोळी, दिलीप पाटील, पिरअल्ली पुणेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.