Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शासकीय परिचारिकांचे उद्या मुंबईत आंदोलन; रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता

राज्य शासनाने त्या मागण्या तत्काळ 9 जुलैपर्यंत सोडाव्यात, तसेच प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यास या एकदिवसीय आंदोलनाचे रुपांतर त्याचदिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2025 | 08:00 AM
शासकीय परिचारिकांचे 9 जुलैला मुंबईत आंदोलन

शासकीय परिचारिकांचे 9 जुलैला मुंबईत आंदोलन

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन’च्या वतीने हे आंदोलन येत्या 9 जुलैला केले जाणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने परिचारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी केले आहे.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या ही राज्यव्यापी श्रमिक संघटना पाच दशकांपासून शासकीय परिचारिकांच्या (वैद्यकीय शिक्षण विभाग/सार्वजनिक आरोग्य विभाग) विविध प्रलंबित मागण्यांबाबत अविरत काम करत आहे. शासनाबरोबर चर्चेच्या माध्यमातून अनेक मागण्या संघटनेने पूर्ण केलेल्या आहेत. परंतु, अनेक प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्यांबाबत राज्य शासनाला वारंवार पत्र व्यवहार केलेला असून, बैठकीदेखील पार पडलेल्या आहेत. परंतु, अजूनही मागण्या प्रलंबितच आहे.

राज्य शासनाने त्या मागण्या तत्काळ 9 जुलैपर्यंत सोडाव्यात, तसेच प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यास या एकदिवसीय आंदोलनाचे रुपांतर त्याचदिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे

दरम्यान, या आंदोलनास राज्यभरात कार्यरत शासकीय परिचारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक सल्लागार कमल वायकोळे, सरचिटणीस विशाल सोनार यांनी केले.

प्रलंबित मागण्या नेमक्या काय?

खुल्लर समिती (वेतन आयोग वेतन त्रुटी निवारण समिती) अनुसार वेतन वाढ निश्चिती करावी. प्रलंबित सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करून परिचारिकांना प्रलंबित प्रदोन्नती द्यावी. ग्रामीण रुग्णालय येथे परिसेविका पद पुनर्जीवित करावे. नर्सिंग भत्ता केंद्राप्रमाणे द्या, शैक्षणिक भत्ता द्या, गणवेश आणि धुलाई भत्ता द्या, नाईट सुपर भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार द्यावा.

याशिवाय, भारतीय परिचर्या परिषद, IPHS आणि MCI च्या मानांकनानुसार सुधारित आकृतीबंध तयार करून पदनिर्मिती करावी आणि त्यानुसार पदे भरावीत. बंधपत्रित परिचारिकांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांक पासून सेवेत रुजू करावे. स्वतंत्र परिचर्या संचलनालय निर्माण करण्यात यावे. प्रशासकीय बदलीमधून परिचारिकांना वगळावे. परिचारिकांना कर्तव्यस्थानी सुरक्षा प्रदान करावी, यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागण्या सोडवा, नसता कामबंद आंदोलन करू

राज्य शासनाने मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या तत्काळ शासकीय परिचारिकांच्या विविध मागण्या मार्गी लावाव्यात. कारण कोविडसारख्या महामारीत या परिचारिकांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. तरीदेखील शासन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या 9 जुलैला जर या परिचारिकांचे प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवले नाही तर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Web Title: Government nurses in the maharashtra to protest in mumbai tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nurses

संबंधित बातम्या

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम
1

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश
2

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त
3

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
4

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.