Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

विद्यार्थी, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आपले सरकार पोर्टलवरील सेवांची तांत्रिक देखभाल करणे आवश्यक असेल, तर ती दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत करता आली असती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 09:48 AM
'आपले सरकार' पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

'आपले सरकार' पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

Follow Us
Follow Us:
  • शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोंडी
  • पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
  • विविध सेवांसाठी ‘वेट’; विद्यार्थी झाले हैराण
मुंबई : डेटा सेंटरचे स्थलांतर आणि तांत्रिक प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या बंद केल्या जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी पोर्टलवरील सेवा बंद राहणार आहे.

शासनाकडून शासकीय सेवा अधिकाधिक ऑनलाइन करण्यावर भर दिला जात असताना, तांत्रिक कारणांमुळे सेवा अनेक दिवस बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होऊ शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती अर्ज, विविध प्रमाणपत्रे आणि अंतिम मुदतीशी संबंधित कामे प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पोर्टल बंद असलेल्या कालावधीत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, मुदतीच्या आत अर्ज सादर करू न शकलेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार दिलासा द्यावा आणि पोर्टल पुन्हा सुरू होण्याची निश्चित वेळ अधिकृतपणे जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

एकीकडे या निर्णयामुळे नागरिकांना असुविधा होणार आहे तर दुसरीकडे केंद्र चालकांना आर्थिक फटका बसणार आहे. विशेषतः आपले सरकार सेवा केंद्रे आणि महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना सेवा देणाऱ्या चालकांसमोरही अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोंडी

या निर्णयामुळे विद्यार्थी, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आपले सरकार पोर्टलवरील सेवांची तांत्रिक देखभाल करणे आवश्यक असेल, तर ती दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत करता आली असती. ऐन कामकाजाच्या दिवसांत पोर्टल बंद ठेवल्यामुळे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी

अनेक नागरिकांची महत्त्वाची कामे आणि शासकीय योजनांचे अर्ज अंतिम मुदतीत पूर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, प्रलंबित कामांसाठी आवश्यक मुदतवाढ द्यावी आणि नागरिकांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विविध सेवांसाठी ‘वेट’; विद्यार्थी झाले हैराण

आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिक उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करतात. पोर्टल बंद राहिल्याने नवीन अर्ज दाखल करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसारख्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Aaple sarkar portal to remain closed until wednesday nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Aaple Sarkar
  • Government Scheme
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
1

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा
2

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
3

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
4

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.