Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट

सकल हिंदू समाज, म्हसवड मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध धार्मिक, सामाजिक व विचारप्रवर्तक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 09:36 PM
म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य 'हिंदू संमेलना'चे आयोजन

म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य 'हिंदू संमेलना'चे आयोजन

Follow Us
Follow Us:

 

  • म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार!
  • ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन
  • महिलांना मिळणार विशेष भेट
म्हसवड दि. ३०: शहर व परिसरातील हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी, तसेच हिंदुत्व विचारांच्या जागृतीसाठी म्हसवड येथे ३ एप्रिल २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता म्हसवड बाजार पटांगण येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकल हिंदू समाज, म्हसवड मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध धार्मिक, सामाजिक व विचारप्रवर्तक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. हिंदू संस्कृतीचा गौरव, परंपरा आणि एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून योगी वृषभ नाथगिरी महाराज (जनरल थानापती, पंच दशनाम आवाहन आखाडा, उज्जैन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कराड येथील श्री. विजयराव जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला जाणार असून उपस्थितांना प्रेरणादायी विचार मिळणार आहेत.

कावडी गाव ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!

म्हसवड व परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढण्यास आणि हिंदुत्व विचारांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या भव्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी म्हसवड शहरातील सर्व हिंदु समाजाने उपस्थित रहावे यासाठी सकल हिंदु समाजातील कार्यकर्ते हे घरोघरी जावुन नागरीकांना आवाहन करीत असुन यामध्ये सहभागी होणार्या महिलांना मोफत साडी भेट म्हणुन दिली जाणार असल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात येत आहे.

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

Web Title: Grand hindu conference organized in mhaswad on april 3rd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • Mhaswad
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
1

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
3

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
4

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.