Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST मध्ये ग्रॅजुटी घोटाळा! प्राथमिक माहितीत ६३ अधिकारी दोषी! दोन वर्षात अडीच कोटींचे व्याज वाटप

२६ विभागातील ४८० निवृत्ताना न्यायालयीन निर्णयामुळे दोन वर्षात सुमारे अडीच कोटी रुपये इतके व्याज द्यावे लागले असून या घोटाळ्यात अडकलेल्या ६३ अधिकाऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल करण्याची मागणी केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 05:48 PM
Gratuity Scam MSRTC ST bus Preliminary Findings Implicate 63 Officers maharashtra news

Gratuity Scam MSRTC ST bus Preliminary Findings Implicate 63 Officers maharashtra news

Follow Us
Follow Us:

ST Bus News : मुंबई : एसटी महामंडळात निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपदान म्हणजेच ग्रॅज्युटी वेळेत न दिल्याने नमुना म्हणून मागील दोन वर्षातील आकडेवारी तपासली असता,धक्कादायक वास्तव समोर आले असून २६ विभागातील ४८० निवृत्ताना न्यायालयीन निर्णयामुळे दोन वर्षात सुमारे अडीच कोटी रुपये इतके व्याज द्यावे लागले असून या घोटाळ्यात अडकलेल्या ६३ अधिकाऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांसाठी उपदान विश्वस्त मंडळ असून त्यातून निवृत्ती नंतर ३० दिवसांच्या आत ग्रॅज्युटी रक्कम देण्याचा नियम आहे. पण कर्मचाऱ्याची प्रत्येक वर्षात किमान २४० दिवस उपस्थिती असणे आवश्यक आहे की नाही याबाबतीत संभ्रभ आहे .त्याच प्रमाणे नोकरीच्या सुरवातीच्या काळात रोजंदारीवर काम केले असेल तो कालावधी पकडण्यात यावा की नाही या बाबतीतही संभ्रभ आहे, असे तकलादू कारण देत तसेच कर्मचाऱ्याने निवृत्त होताना उपदान रक्कम मागणी केली नाहीतर तर अशी प्रकरणे निर्णयाविना पडून राहतात.

हे देखील वाचा : MSRTC News: “जनतेच्या जिव्हाळ्याची ‘ST’ लवकरच…”; काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

कालांतराने ग्राजूटी वेळेवर न मिळाल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी न्यायालयात जातात. व अशी प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.परिणामी त्या रकमेवर एसटीला व्याज व चक्रवाढ व्याज द्यावे लागते. या बाबतीत महामंडळाने सन २०१०, २०१४ व २०२३ मध्ये स्पष्ट निर्देश देणारी परिपत्रके काढली तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने व काही ठिकाणी संगनमताने बरीच प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असून या प्रकरणी फक्त नमुना म्हणून एसटीच्या व्यवस्थानाने मागील दोन वर्षांतील आकडेवारी संकलित केली असता मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय दिल्याने अवघ्या दोन वर्षात २६ विभागातील साधारण ४८० निवृत्तांना अंदाजे अडीच कोटी रुपये इतकी रक्कम व्याज म्हणून देण्यात आली आहे .

हे देखील वाचा : ‘आपली बस, आपली सेवा’ १ मे पासून एसटीचे नवे अभियान..; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

त्याच प्रमाणे हा प्रकार अजूनही सुरूच असून गेल्या दोन वर्षात साधारण आठ कोटी रुपये इतकी ग्रॅज्युटीची रक्कम विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.ज्यांच्या बेपर्वाईमुळे महामंडळाला विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागला अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे असेही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

Web Title: Gratuity scam msrtc st bus preliminary findings implicate 63 officers maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • pratap sarnaik
  • st bus news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
3

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.