Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP MLA statement: प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली; ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला

BJP MLA statement: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरनाईक यांच्यावर निशाणा साधताना मेहता यांनी ‘सठिया गये, बूढे हो गये’ असे वक्तव्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 10, 2026 | 03:17 PM
प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली; ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला

प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली; ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला

Follow Us
Follow Us:
  • प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली
  • ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला
  • आमदार नरेंद्र मेहता यांनी वेगळाच दावा
 

विजय काते, मिरा-भाईंदर: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘सठिया गये, बूढे हो गये, त्यांना उपचाराची गरज आहे’, अशी टीका मेहता यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

मिरा-भाईंदरमधील शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, आता हा राजकीय वाद व्यक्तिगत टीकेपर्यंत पोहोचल्याने स्थानिक राजकारणात वातावरण अधिक तापले आहे.

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप; चौकशीची मागणी

मिरा-भाईंदर महापालिकेच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची थकीत देयके अदा करण्यासाठी महापालिकेची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपकडून घेतला जात असल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. हा निर्णय खासगी फायद्यासाठी घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर केला होता. या आरोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सरनाईक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी वेगळाच दावा केला. सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्यासाठी कर्ज घेण्याचा निर्णय प्रशासकीय राजवटीत तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीच घेतला होता, असा दावा मेहता यांनी केला. या निर्णयामुळेच महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी सरनाईक यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करताना मेहता यांनी, ‘सरनाईक यांना आता या निर्णयाचा विसर पडला आहे. सठिया गये, बूढे हो गये,’ अशी टिप्पणी केली. तसेच सरनाईक यांच्याकडे सध्या विषयाची अर्धवट माहिती असल्याचा दावा करत, त्यांना विसर पडत असल्याने चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचा सल्लाही मेहता यांनी दिला.

मेहता यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला आता वैयक्तिक टीकेची किनार मिळाली असून, या वक्तव्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

Web Title: Bjp mla criticizes pratap sarnaik sathiya gaye boodhe ho gaye remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.