Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये जीसटी विभागाचा छापा, ज्वेलर्सकडून कर चुकवला गेल्याच्या संशयामुळे कारवाई

कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने छापेमारी केली आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद केलेे आणि चौकशी सुरु केली.

  • By साधना
Updated On: Mar 11, 2023 | 01:28 PM
bafna jwellers

bafna jwellers

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजी नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलच्या (Kagal) निवासस्थानी ईडीने (ED)  तिसऱ्यांदा छापा मारला आहे, तर आता दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने (GST Recovery Squad) छापा घातला आहे. शुक्रवारी सुरु झालेली छापेमारीची कारवाई अजूनही सुरुच आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील एका सराफा दुकानावर शुक्रवारी जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला. शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाच्या पथकाचा दुकानात तपास सुरु होता. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानात थांबवून ठेवण्यात आले होते. आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे. बाफना ज्वेलर्स असं कारवाई करण्यात आलेल्या सराफा दुकानाचं नाव आहे.

आर्थिक वर्षातील मार्च हा अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय झाल्याचं दिसत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील बाफना ज्वेलर्स जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. शहरातील जालना रस्त्यावरील बाफना ज्वेलर्स या सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. शुक्रवारी सुमारे 10 तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांविषयी चौकशी केली. त्यानंतर आज देखील कारवाई सुरूच असून, या काळात सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले. शुक्रवारी दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही ही चौकशी सुरू आहे.

कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केली आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद केलेे आणि चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. वेगवेगळ्या बिलांची तपासणी सुरु असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय आहे. त्यानुसार चौकशी सुरु आहे. या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Gst raid at bafna jwellers of chhatrapati sambhajinagar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2023 | 01:28 PM

Topics:  

  • Aurangabad news
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.