Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

Satara News: नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या विविध अर्ज आणि तक्रारींच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाकडून वेग देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात नागरिकांशी संबंधित तब्बल १,२३६ प्रकरणे मार्गी लावण्यात आली असून, प्रशासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून अर्जांचा पाठपुरावा करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 06:41 PM
अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांच्या अर्जांवर जलद कार्यवाही
  • पालकमंत्री कार्यालयाकडून वर्षभरात १,२३६ प्रकरणे निकाली
  • १२ महिन्यांत १,२३६ प्रकरणांना न्याय
सातारा : नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून वर्षभरात तब्बल १ हजार ७०७ अर्ज व निवेदने हाताळण्यात आली. यापैकी १ हजार २३६ प्रकरणांमध्ये कार्यवाही पूर्ण झाली असून, ४७१ अर्जांवरील प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ आणि जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा थेट पाठपुरावा करण्यात आला.पालकमंत्री आपल्या दारी या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले या वर्षापूर्वीच्या पार्श्वभूमीवरराज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली .

१५ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील कामकाजाचा आढावा पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत मांडला. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांमध्ये महसूल आणि शिधापत्रिकेशी संबंधित बाबींचे प्रमाण लक्षणीय होते. त्यासोबतच पोलीस, सिंचन, महावितरण, एसटी, शेती, वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागांशी संबंधित तक्रारीही मोठ्या संख्येने प्राप्त झाल्या. पालकमंत्री कार्यालयात थेट १ हजार १२१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८२० अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली, तर ३०१ अर्ज प्रक्रियेत आहेत. जनता दरबारातून आलेल्या ५८६ अर्जांपैकी ४१६ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी

प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय वाढविण्यावर भर

नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा केवळ नोंदवहीपुरता पाठपुरावा न करता संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये जागेवरच निर्णय घेण्यात आले. अर्जांच्या स्थितीचा नियमित आढावा घेण्यासाठी बैठकीनंतर इतिवृत्त तयार करून संबंधित विभागांना पाठविणे, तसेच अनुपालन अहवाल मागविण्याची पद्धत राबविण्यात आली.

६४ बैठका; महसूल विभाग आघाडीवर

विविध प्रशासकीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वर्षभरात ६४ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या. यामध्ये महसूल विभागाच्या २४ बैठका सर्वाधिक झाल्या. वन विभागाच्या सात, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रत्येकी पाच, लघुपाटबंधारे विभागाच्या चार, तर कृषी, एसटी आणि सिंचन विभागाच्या प्रत्येकी तीन बैठका घेण्यात आल्या.

पाटणमधील बॉक्साईट नोंदीचा प्रश्न मार्गी

पाटण तालुक्यातील काठीटेक आणि अवसरी येथील जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ सदरातील बॉक्साईटचे शिक्के हटविण्याच्या मागणीवरही शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित नोंदींबाबत निर्णय घेण्यात आला. दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिधापत्रिका हस्तांतरण, अन्नधान्याचा लाभ, शेतीच्या वहिवाटीचे रस्ते, घरकुल तसेच दुर्गम भागातील एसटी सेवा यांसारख्या सामूहिक हिताच्या प्रश्नांवरही कार्यवाही करण्यात आल्याचे पालकमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

एकूण १,७०७ अर्जांपैकी ७२.४० टक्के प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण झाल्याने हे कार्यालय नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी नमूद केले.

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Web Title: Guardian minister office resolves 1236 cases in one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Government
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
1

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
2

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू
3

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?
4

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.