Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GBS Virus : सावधान! जीबीएस महाराष्ट्रात पसरतोय, सोलापुरात एकाचा मृत्यू?

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (JBS) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना, याची लागण झालेल्या सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके अंतिम कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 26, 2025 | 09:11 PM
सावधान! जीबीएस महाराष्ट्रात पसरतोय, सोलापुरात एकाचा मृत्यू?

सावधान! जीबीएस महाराष्ट्रात पसरतोय, सोलापुरात एकाचा मृत्यू?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (JBS) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना, याची लागण झालेल्या सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके अंतिम कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले, तरी रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचे निदान ११ जानेवारीला झाले होते, त्यामुळे हा जीबीएसचा पहिला मृत्यू ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापुरातही भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सनदी लेखापाल मूळचा सोलापूरचा असून तो पुण्यात धायरी परिसरातील एका कंपनीत नोकरी करीत होता.  गेल्या ११ जानेवारी रोजी त्यास गुइलेन गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याला उलट्यांचा त्रास वाढला होता. त्याने पुण्याऐवजी स्वतःच्या गावी, सोलापुरात येऊन वैद्यकीय उपचार घेणे पसंत केले. मात्र एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्यास पाच दिवस अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु पुन्हा प्रकृती बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी हलविण्यात आला असता मृतदेहाची चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने न्यायवैद्यक तपासणी केली. यात रुग्णाचा मृत्यू ‘जीबीएस’मुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. रासायनिक पृथ:करण अहवाल पंधरा दिवसांनी प्राप्त होणार असून त्यावेळी मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट होणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रासायनिक पृथ:करण्याचा अहवाल पंधरा दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल.

GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यात GBS या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात एकाचा मृत्यू देखील झाला आहे.

पुणे शहरामध्ये गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) अनेक रुग्ण आढळत आहेत. आत्तापर्यंत 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रोगाचा उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

Web Title: Guillain barre syndrome jbs patients rise in maharashtra patient died in solapur due to jbs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • GBS virus
  • pune news
  • Solapur News

संबंधित बातम्या

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती
1

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
2

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

Dannyy Pandit Reel : फुल सपोर्ट भावा! सुदामेनंतर आता डॅनी पंडितही मैदानात; बनवली हिंदू मुस्लीम ऐक्याची रिल
3

Dannyy Pandit Reel : फुल सपोर्ट भावा! सुदामेनंतर आता डॅनी पंडितही मैदानात; बनवली हिंदू मुस्लीम ऐक्याची रिल

Maratha Andolan : खेड टोलनाक्यावर वाहतूक धीम्या गतीने; शेकडो वाहनांची मार्गावर गर्दी
4

Maratha Andolan : खेड टोलनाक्यावर वाहतूक धीम्या गतीने; शेकडो वाहनांची मार्गावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.