reel star danny pandit new reel on hindu muslim unity in ganeshotsav 2025
dannyy pandit Reel : पुणे : रिलस्टार अथर्व सुदामे याने हिंदू मुस्लीम वादावर रिल शेअर केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अथर्व सुदामे याने मुस्लीम मूर्तीकाराकडून मूर्ती खरेदी करण्याबाबत व्हिडिओ केला होता. यावरुन हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी जोरदार टीका केली होती. वादानंतर अथर्व सुदामे याने व्हिडिओ डिलीट करत माफी देखील मागितली होती. मात्र आता मित्राच्या मदतीला मित्र धावून आला आहे. आता सुप्रसिद्ध रिलस्टार डॅनी पंडित याने देखील हिंदू मुस्लीम ऐक्यावर रिल शेअर केली आहे.
लोकप्रिय रिलस्टार डॅनी पंडित याने सोशल मीडियावर रिल शेअर केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने डॅनीने व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये घराच्या बाप्पाची आरती सुरु असल्याचे दाखवण्यात आले आहे. घरी बाप्पा विराजमान झाला असून सर्वजण मनोभावे गणरायची आरती करत आहे. तेवढ्यात झोया नावाच्या मुलीची आई तिला आवाज देते. आरतीमधून ही चिमुकली गेल्यामुळे सर्वांना वाईट वाटते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरती झाल्यानंतर ही चिमुकली पुन्हा एकदा घरामध्ये येते. यावेळी तिच्या हातामध्ये एक थाळी असते. ती डॅनीकडे ही थाळी देते. डॅनी पंडित थाळी उघडतो तर आतमध्ये उकडीच्या मोकदांचा प्रसाद असतो. यावर डॅनी चिमुकलीला हे कोणी दिले म्हणून विचारतो. यावर चिमुकली झोया म्हणते की हे अम्मीने दिले आहे. या रिलमधून डॅनी पंडित याने गणेशोत्सवामधील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून दिले आहे. त्यामुळे अथर्व सुदामे याची रिल डिलीट करण्यात आल्यानंतर आता डॅनी पंडित देखील या मैदानामध्ये उतरला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेहमी आपल्या रिल्समधून हसवणाऱ्या अथर्व सुदामेने गणेशोत्सावाच्या निमित्ताने व्हिडिओ शेअर केली होती. यामध्ये त्याने हिंदू मुस्लीम ऐक्याचा विषय हाताळत व्हिडिओ तयार केली होता. मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अथर्वने व्हिडिओ जारी करत माफीही मागितली आहे. अथर्व सुदामे याने या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबादेखील दिला आहे. राजकीय नेत्यांनी त्याची रिल शेअर करत पाठिंबा दर्शवला होता. आता त्याच्या मदतीला डॅनी पंडित धावून आला आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याची व्हिडिओ आता डॅनीने देखील शेअर केली आहे.