Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunaratna Sadavarte : ‘राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?’ गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल

Gunaratna Sadavarte On Marathi Bhasha : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 07, 2025 | 12:53 PM
'राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?' गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल (फोटो सौजन्य-X)

'राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?' गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानावर थेट निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरे यांच्यावरच नाी तर सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. “उद्धव मला असं वाटतं तुम्ही एखादे व्यंगचित्रकार असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात. तुम्ही भाषेचे ज्ञानी नाहीत. तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात, अशी खोचक टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

Udayanraje Bhosale: मेलो तरी चालेल, पण…; महापुरूषांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना उदयनराजेंचा थेट इशारा

‘तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?’

“राज ठाकरे ज्या पद्धतीने व्यक्त झाले, मला खरोखरच राज ठाकरेंची कीव येते. राज ठाकरे मला हे सांगा, तुमचं जी मुलं आहेत. तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वत:चे लेकरं कॉन्व्हेंट, स्वत:ची लेकरं आयबीडीपीमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका”, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला. “संविधानानुसार भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असं काहीही नाही”, असंदेखील सदावर्ते म्हणाले.  अशी माहिती  एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

“आमचा उत्तर भारतीय असेल, गुजराती बांधव असेल, भोजपुरी भाषिक असेल, बंगाली असेल, सगळ्या भाषांचं सौंदर्य आहे. भाषा हा व्यक्त होण्याचा फॉर्म्युला आहे. भाषा ही सक्तीची असावी हे मुघली विचार असू शकतो”, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

“ऋषींसारखे भैय्याजी जोशी यांचे ७० वर्षांचा गाढा अभ्यास, संघ प्रवास आणि ते संघाचे पूर्व कार्यवाहक होते. त्यांच्या एकूण चिंतनातून व्यक्त झालेली ही बाब आहे. भाषेला अभिजात म्हणण्यापेक्षा भाषा ही आपल्या इच्छेनुसार व्यक्त होण्यासाठी एक मानवी जीवनाला मिळालेलं साधन आहे. आम्ही भैय्याजी जोशींच्या विधानांचे समर्थन करतो. आम्ही त्यांच्या विधानांचे मनापासून स्वागत करतो”, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या गटाने दिली.

भैय्याजी, जोशींचे विधान काय आहे?

“मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भाषात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती, त्याचप्रमाणे गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ घातला. तसेच राज ठाकरे यांनीदेखील टीका केली. पण वकील गुणरत्न सदावर्ते हे भय्याजी जोशींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

शैक्षणिक क्षेत्राला काळिमा! ‘बदलापूर’ची पुनरावृत्ती, शाळेतील सेवकाचा 10 वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Web Title: Gunaratna sadavarte support bhaiyyaji joshi statement and slams raj thackeray news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Gunaratna Sadavarte
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश
1

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक
2

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा
3

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा

आता धारावीचा पुनर्विकास होणार!  एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक
4

आता धारावीचा पुनर्विकास होणार! एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.