पक्षचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष (Photo Credit- Social Media)
सातारा : गेल्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या विरोधात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ महापुरूषांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात या अधिवेशनातच कायदा करावा. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शित्रा झाली पाहिजे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांना जातीचे किंवा पक्षाचे नसतात, त्यांच्यात फक्त विकृती असते. कोरटकर असो वा अबू आझमी ही फक्त नावे आहेत. भविष्यात अजून कोणी सोम्या गोम्या येतील, पण अशांना शिक्षा झाली तर पुन्हा कोणी हिंमत करणार नाही’ अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने होणाऱ्या बेताल वक्तव्यांवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारकडे अशा लोकांची ‘नसबंदी’ करण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.”बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी याच अधिवेशनात कायदा आणा आणि त्यांना किमान १० वर्षांची शिक्षा द्या,” अशी ठाम भूमिका उदयनराजेंनी घेतली. प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून त्यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत सरकारला खडे बोल सुनावले.
पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांनी सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा करण्याचीही गरज असल्याचे स्पष्ट केले.
“सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास करून समाजात चुकीचे संदेश दिले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने तातडीने समिती नेमावी आणि कठोर कायदा करावा,” असे ते म्हणाले.
याशिवाय, शासनमान्य इतिहास समोर आल्यास अनेक विकृत लोकांची ‘नसबंदी’ होईल, अशा कठोर शब्दांत त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना फटकारले.
प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले, “विकृत लोकांना कोणताही पक्ष किंवा जात नसते. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी भाजपचा बचावही केला.
राज्यात महापुरुषांचा अपमान करणाऱ्या घटनांवरून वातावरण तापले असून, उदयनराजे यांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच “कोणाकडे कोणतेही संरक्षण असले तरी एखाद्याची मानसिकता ‘मेलो तरी चालेल, पण याला खलास करणार’ अशी झाली, तर कोणही त्याला रोखू शकत नाही. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका,” असे उदयनराजेंनी असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबच्या समाधीच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चावरही नाराजी व्यक्त केली. “औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळे वाचवली, पण औरंगजेबाने त्यांच्याविरोधात काम केले. मग त्याची समाधी जपायची काय गरज?” असा सवाल करत, “तो एक लुटारू आणि चोर होता,” असे स्पष्ट शब्दांत उदयनराजेंनी सांगितले.
उदयनराजेंच्या या तीव्र वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी त्यांनी केली असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.