Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वृद्धाचे अर्धनग्न आंदोलन! पुरवठा विभागाचा कारभार चव्हाटयावर

बोराळे येथील ८० वर्षाचे वृध्द आनंदा निर्मळ व त्यांच्या पत्नी यांना रेशनचे धान्य गेल्या सहा महिन्यापासून अंगठा उमटत नाही या कारणास्तव देण्यास टाळाटाळ करीत असल्याने चक्क या वृध्द जोडप्यांनी तहसिलदार यांच्या दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याची वेळ त्यांना आल्याने पुरवठा विभागाचा कारभार चव्हाटयावर आला असून वृध्दांच्या अर्धनग्न आंदोलनामुळे महसूलच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी सर्वच स्तरावरुन व्यक्त होत आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 27, 2023 | 03:53 PM
वृद्धाचे अर्धनग्न आंदोलन! पुरवठा विभागाचा कारभार चव्हाटयावर
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : बोराळे येथील ८० वर्षाचे वृध्द आनंदा निर्मळ व त्यांच्या पत्नी यांना रेशनचे धान्य गेल्या सहा महिन्यापासून अंगठा उमटत नाही या कारणास्तव देण्यास टाळाटाळ करीत असल्याने चक्क या वृध्द जोडप्यांनी तहसिलदार यांच्या दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याची वेळ त्यांना आल्याने पुरवठा विभागाचा कारभार चव्हाटयावर आला असून वृध्दांच्या अर्धनग्न आंदोलनामुळे महसूलच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी सर्वच स्तरावरुन व्यक्त होत आहे.

बोराळे गावचे वयोवृध्द आनंदा निर्मळ (वय ८०) यांना गेल्या सहा महिन्यापासून मशीनवर अंगठा उमटत नसल्याचे कारण पुढे करुन त्यांना धान्य देण्याचे स्वस्त धान्य दुकानदार टाळत असल्याने या बाबतची तक्रार अनेक वेळा महसूलचे अधिकारी यांच्याकडे करुनही त्यांनीही दुर्लक्ष या वृध्दाकडे केल्याचा आरोप त्या आंदोलनकर्त्या कुटूंबियांचा आहे.
–
प्रहार संघटनेचे राजकुमार स्वामी यांच्याकडे धान्य मिळत नसल्याची तक्रार त्या वृध्दाने केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच अर्धनग्न अवस्थेत या वृध्द जोडप्याने धान्य मिळावे या मागणीसाठी महसूल अधिकारी यांच्या दालनासमोर चक्क उंबर्‍यावर बसून आंदोलन केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली व तात्काळ पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना बोलावून या वृध्दांच्या धान्याचा प्रश्न मार्गी लावा अशा कडक शब्दात पुरवठा विभागात काम करणार्‍या अधिकार्‍याचे कान टोचले. या वृध्द जोडप्यांना मुलगा संभाळत नसल्यामुळे त्यांचे जीवन रेशनच्या धान्यावरच अवलंबून असल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते वृध्द तहसिल कार्यालयात दोन वाजेपर्यंत थांबूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. आंदोलनास प्रारंभ करतास तात्काळ त्या घटनेची दखल घेण्यात आली.

-मनमानी पध्दतीने कारभार
पुरवठा विभागाच्या या अंधाधुंद कारभाराबद्दल सर्व स्तरामधून संताप व्यक्त होत आहे. तेथील अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांशी चर्चा करुन प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना तसा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे निष्पन्न झाले. सध्या या पुरवठा विभागात झीरो कर्मचाऱ्यांचा मोठा भरणा असून हे कार्यालय चक्क त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे मनमानी पध्दतीने कारभार सुरु असल्याच्या तिखट प्रतिक्रीया आहेत. तत्कालीन तहसिलदार स्वप्निल रावडे यांच्या कारकिर्दीत येथील कारभार स्वच्छ चालत असताना सध्या पुरवठा विभागाची अवस्था अशी का झाली? असा प्रश्न काम घेवून येणार्‍या नागरिकामधून विचारला जात आहे. ऑनलाईन रेशन बाबत नागरिकांच्या तक्रारी असून त्यांच्या तक्रारी न सोडविल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.

[blockquote content=” या वृध्द जोडप्यांना गेल्या सहा महिन्यापासून रेशन दुकानदार धान्य देत नव्हता. वृध्द झाल्याने अंगठ्याचा ठसा पुसट झाल्याने तो उमटत नव्हता. तहसिल कार्यालयात या वृध्दाने हेलपाटे मारुन दखल घेतली नाही. आंदोलन दिवशी सकाळी ११ ते २ या वेळेत थांबूनही महसूल अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने शेवटी अर्धनग्न आंदोलन करावे लागले. ऑनलाईन रेशन कार्ड न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. ” pic=”” name=”-राजकुमार स्वामी, अध्यक्ष प्रहार संघटना, बोराळे”]

Web Title: Half naked protestof the elder in charge of supply department nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2023 | 03:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangalwedha
  • Mangalwedha News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : देवळालीला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा; घरांवरील पत्रे उडाले, पिकांचेही मोठे नुकसान
1

Solapur News : देवळालीला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा; घरांवरील पत्रे उडाले, पिकांचेही मोठे नुकसान

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
2

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
3

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
4

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.