Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

घर बांधण्यासाठी तुझ्या बापाकडून दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्यावरुन पतीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2024 | 10:47 AM
घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

माजलगाव : घर बांधण्यासाठी तुझ्या बापाकडून दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. शहरातील इदगाह मोहल्ला भागातील मुलीचे लग्न बीड येथील इम्रान इब्राहीम खान (रा. इस्लामपुरा, बीड) याच्यासोबत २० ऑक्टोबर २०१९ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे संसारोपयोगी सर्व वस्तू देऊन झाले होते.

लग्नानंतर एक मुलगी झाली. लग्नानंतर सासरच्या लोकांनी तीन वर्षे चांगले नांदवले. त्यानंतर पती इम्रान इब्राहिम खान (पती), इब्राहिम नवाज खान (सासरा), अमेर इब्राहीम खान (दीर), अफ्रोज इब्राहिम खान (दीर) (सर्व रा. इस्लामपुरा बीड), निलोफर इसाख शेख (ननंद) (रा. चौसाळा ता. जि. बीड) यांनी विवाहितेस तुझ्या आई-वडिलांकडून आपल्याला घर विकत घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणू लागले.

त्यावर विवाहितेने माझे आई-वडील मजुरी काम करुन पोट भरतात. त्यांना चार मुलींचे लग्न करायचे आहे, त्यांच्याकडे कोठून पैसे येणार? असे सांगितले.

मानसिक, शारीरिक छळ

मानसिक आणि शारीरिक छळ करून लाथाबुक्याने मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर विवाहितेचे आई-वडील तीस बीड येथे सासरी घेऊन गेले व सासरचे लोकांना बैठक बोलावून एक लाख रुपये दिले. त्यानंतर चार ते पाच महिने माझे सासरच्या लोकांनी तिला चांगले नांदवले. परत पती व वरील इतर सासरचे लोक घराचे पैसे देण्यासाठी पैसे कमी पडत आहेत, असे म्हणून तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये नाहीतर तू इथे राहू नकोस, असे म्हणून मानसिक व शारीरीक छळ करून सतत उपाशीपोटी ठेऊन शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली.

Web Title: Harassment of a married woman by asking her to bring money from her husband to build a house nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक
1

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळला झुरळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी
2

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळला झुरळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
3

भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
4

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.