Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरभरा-तूरच्या सरकारी खरेदीला आला वेग! अमरावती जिल्ह्यात १५ केंद्रांवर ९ हजार १४५ शेतकऱ्यांची झाली नोंदणी पूर्ण

जिल्हा पणन व्यवस्थापक सौरभ ठाकरे आणि जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांनी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यांनी तातडीने नोंदणी करून सरकारी खरेदी केंद्रांचा लाभघ्यावा, असे आवाहन केले.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2026 | 03:30 PM
हरभरा-तूरच्या सरकारी खरेदीला आला वेग! अमरावती जिल्ह्यात १५ केंद्रांवर ९ हजार १४५ शेतकऱ्यांची झाली नोंदणी पूर्ण

हरभरा-तूरच्या सरकारी खरेदीला आला वेग! अमरावती जिल्ह्यात १५ केंद्रांवर ९ हजार १४५ शेतकऱ्यांची झाली नोंदणी पूर्ण

Follow Us
Close
Follow Us:

जिल्ह्यात रब्बी पणन हंगामात हरभरा आणि तूर या प्रमुख कडधान्यांच्या सरकारी खरेदीला वेग आला असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात १५ सरकारी खरेदी केंद्रे सुरू केली आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ९ हजार १४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण १६ हजार ९७७.५ क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. रब्बी पणन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हरभरा व तूर खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि बाजारातील चढउतारांचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी १५ सरकारी खरेदी केंद्रे कार्यान्वित केली आहे. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर खरेदी केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Maharashtra Population: १६ वर्षांनी जनगणनेचा बिगुल! नागरिकांना ३३ प्रश्न विचारणार; माहिती राहणार गोपनीय

जिल्हा पणन व्यवस्थापक सौरभ ठाकरे आणि जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांनी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यांनी तातडीने नोंदणी करून सरकारी खरेदी केंद्रांचा लाभघ्यावा, असे आवाहन केले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार राबवली जात असून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्पादन आणण्यापूर्वी टोकन घेणे आवश्यक असून नियोजित तारखेनुसार धान्याचे वजन करून खरेदी केली जाते. प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीप्रमाणे ठरलेल्या दिवशीच उत्पादन केंद्रावर आणण्याचे आवाहन केले.

विदर्भ सहकारी मार्केटिंग सोसायटी अंतर्गत जिल्ह्यातील ८ सरकारी खरेदी केंद्रांवर हरभरा आणि तूर खरेदी सुरू आहे. या केंद्रांमध्ये अमरावती कृषी बाजार, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, वरुड, मोर्शी, शिंगणापूर (दर्यापूर) आणि मंगरुळ दस्तगीर (धामणगाव रेल्वे) यांचा समावेश आहे. या केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी हरभरा आणि ३ हजार ६२८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. आजपर्यंत १ हजार ५०० क्विंटल हरभरा आणि १४ हजार ३११ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

विदर्भ सहकारी मार्केटिंग सोसायटी अंतर्गत ८ सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी आणि खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. येत्या काळात खरेदीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारी सूचनांनुसार शेतकऱ्याऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बैंक खात्यात दिले जातील, असे मत सौरभ ठाकरे, जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Harbhara tur government procurement speed registration of 9 thousand 145 farmers has been completed at 15 centers in amravati district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Amravati City
  • Amravati District
  • farmer

संबंधित बातम्या

जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प
1

जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प

Farmers News: कर्जमाफी घोषणेनंतरही सावकारी जाच; राज्यात ११ हजारांवर सावकार; तर ९ लाख शेतकरी अद्यापही सावकारांचे देणेकरी
2

Farmers News: कर्जमाफी घोषणेनंतरही सावकारी जाच; राज्यात ११ हजारांवर सावकार; तर ९ लाख शेतकरी अद्यापही सावकारांचे देणेकरी

Yeola News: आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट
3

Yeola News: आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट

सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात
4

सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.