Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाई, कर्जमुक्ती आणि आर्थिक मदतीच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2026 | 12:00 PM
मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारा

मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारा

Follow Us
Follow Us:

Yavatmal News: अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारच्या भूमिकेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या प्रतीकात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवर उपरोधिक प्रहार केला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे

तसोमवारी (दि.१९) यवतमाळ मुख्य टपाल कार्यालयातून सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील पत्त्यावर पाच हजार रुपयांची इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर पाठविण्यात आली. त्यासाठी २५० रुपये कमिशनसह एकूण ५,२५० रुपये अदा करण्यात आले. या व्यवहाराची अधिकृत टपाल पावतीदेखील उपलब्ध आहे. महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्या घरात दिवाळीचा दिवा पेटेल की नाही, याची शाश्वती नाही.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद नाही, कुटुंबावर कर्जाचा डोंगर आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री महोदयांच्या दिवाळीत तरी पैशांची कमतरता पडू नये, म्हणून त्यांना पाच हजार रुपये पाठवले आहेत, अशा उपरोधिक शब्दांत डॉ. वाघमारे यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाई, कर्जमुक्ती आणि आर्थिक मदतीच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

शेतकऱ्यांच्या घरात अंधार

शेतकऱ्यांच्या घरात अंधार आणि सत्ताधाऱ्यांच्या घरात रोषणाई, ही कसली लोकशाही? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर किमान त्यांच्या वेदनांची जाणीव तरी राज्यकर्त्यांनी ठेवावी. मुख्यमंत्री महोदय, आमचे पाच हजार रुपये घ्या, तुमची दिवाळी साजरी करा, पण बळीराजाच्या उद्धवस्त संसाराचे काय? असा सवाल डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news a money order of 5000 rupees sent to the chief minister niraj waghmare from yavatmal takes an ironic dig at the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • drought news
  • farmer
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
1

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
2

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
3

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
4

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.