Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2026 | 01:51 PM
सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Follow Us
Follow Us:

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये  नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. नाना पाटेकर यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं सपकाळ म्हणाले.

नाना पाटेकर यांच्या निधनावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून नाटक व चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी नाटक, चित्रपट व त्यानंतर हिंदी चित्रपटातूनही त्यांनी काम केले. पुरुष व हमीदाबाईची कोठी या नाटकात साकारलेल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. क्रांतीवीर, परिंदा, तिरंगा, वेलकम, प्रहार, सिंहासन, नटसम्राट, देऊळ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. नाना पाटेकर यांनी अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी भरीव आर्थिक मदत केली तसेच जलसंधारणाची कामेही केली आहेत.

नाना पाटेकर यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले पण त्यांचा अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्द व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम पाहता ते खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Web Title: Harshvardhan sapakal has expressed condolences on the passing of nana patekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
1

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
2

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
3

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
4

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.