Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

प्रभू रामाला लुटणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित केला असून, याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 02:54 PM
चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

Follow Us
Follow Us:

नाशिक : अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभूरामचरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये अर्पण केले, सोने चांदीच्या विटा, आभुषणे अर्पण केली पण या रामधनावर विश्वस्त मंडळाने दरोडा टाकला. या दरोड्याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

प्रभू रामाला लुटणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित केला असून, याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या या सत्याग्रहात खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शरद अहिर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश ऊर्फ बब्लू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर, प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्याग्रहाची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने करण्यात आली, त्यानंतर खरा तो एकची धर्म व सत्याग्रहाची सांगता पसायदानाने करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिरात अनेक दिवस लुट सुरु होती, चोरी कोणी केली, कशी केली हे सर्वांना माहित झाले आहे. भाजपा परिवारातील अनेक लोकांना ही चोरी माहित आहे पण ते बोलत नाहीत. श्रीरामालाच लुटल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे पण आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चकार शब्द काढलेला नाही.

एसआयटी चौकशी सुरु असल्याचे दाखवले जात आहे पण ही चौकशी निव्वळ धुळफेक आहे. काल चंपतराय व अनिल मिश्रा यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. आदिवासी, मागासवर्गीय अथवा अल्पसंख्याक समाजाचा जर कोणी आरोपी असता तर त्यांच्या घरावर लगेच बुलडोझर चालवला असता, आता चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘१२ वर्षांपूर्वी मंत्रालये एकमेकांपासून वेगळी चालायची, पीएम मोदींनी…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये अनुप्रिया पटेल यांचे मोठे विधान

सपकाळ पुढे म्हणाले की, प्रभू रामाला लुटणाऱ्या भाजपा आरएसएसच्या दरोडेखोरांविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची अफवा पसरवली होती. पण नाशिकचा सत्याग्रह तर झालाच आहे पण दिनांक ९ जुलैपासून राज्यभर काँग्रेसचा हा सत्याग्रह होणार आहे. आमच्या मनात राम आहे, संविधानात राम आहे, त्यामुळे ‘मुहँ मे राम, बगल में नथुराम’वाल्यांनी काँग्रेसला रामभक्ती बद्दल शिकवू नये. हा सत्याग्रह सुरुच राहणार असून प्रभू रामाला लुटणाऱ्या भाजपाला प्रायश्चित करायला लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

Web Title: Harshvardhan sapkal has demanded an inquiry into the robbery at the ram mandir in ayodhya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
3

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
4

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.