Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नामदेव पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 12:17 PM
सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

Follow Us
Follow Us:

कराड : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नामदेव पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रभावी नेतृत्व करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य मोहन कदम यांनीही नामदेव पाटील यांना आशीर्वाद देत संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला दिला. या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, मुकेश मोहिते, अबरार आदी उपस्थित होते.

 

यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या आगामी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा विशेष गौरव करत सातारा जिल्ह्याला त्यांच्यासारखे अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभणे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. प्रशासकीय अनुभव, विकासदृष्टी आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्यावर केवळ संघटना वाढविण्याचीच नव्हे, तर काँग्रेसची विचारधारा, मूल्ये आणि जनहिताची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आहे. पक्षाने देश आणि राज्याच्या विकासासाठी दिलेले ऐतिहासिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबविलेली विकासकामे आणि त्यामागील दूरदृष्टी समाजापुढे मांडणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. बैठकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरावरील संघटना सक्षम करणे, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद वाढविणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा : पावसाचा धुमाकूळ सुरूच; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी

यानंतर नामदेव पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य मोहन कदम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मोहन कदम यांनी त्यांचे अभिनंदन करत सातारा जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रभावीपणे काम करण्याचा सल्ला दिला. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Satara congress district president namdev patil met mp vishal patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Congress
  • Satara
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
1

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी
2

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
3

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, ‘न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल’
4

राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, ‘न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.