Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच होणार ऑनलाईन; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2025 | 07:48 AM
आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच ऑनलाईन होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच ऑनलाईन होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात आरोग्य सेवा अधिक जलद गतीने मिळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

विधानभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात’, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यातील प्राथमिक आरोग्यसेवा मजबूत करून ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढवावी. नवीन रुग्णवाहिकांसाठी करण्यात येणारे करार, ३९८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८०६ उपकेंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठीची ५९८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. राज्य शासन तसेच वित्तीय संस्थाकडून मिळणाऱ्या निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करा’.

रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी प्राधान्य द्यावं

तसेच, केंद्र शासनाच्या आरोग्य योजना व राज्यातील आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी विभागाने काढलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना लवकर वितरीत करण्यात याव्यात. नवीन पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापनेबाबत सर्व कार्यवाही गतीने करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सर्वसमावेशक आराखडा तयार करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औषधे व उपकरणांची खरेदी सुलभपध्दतीने करा. आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवा. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची क्षमता बांधणीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेल्या रुग्णालयांचा सर्व डेटा ऑनलाईन उपलब्ध करा.

…तर आरोग्य सेवा देता येतील सुलभ

याशिवाय, एकाचवेळी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्यामुळे रुग्णांना आणि आरोग्य विभागाला आरोग्य सेवा सुलभ देता येतील. नागरिकांना आरोग्य विभागातील सर्व योजनांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाचे संकेतस्थळदेखील अद्ययावत करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Health department services will soon be online says chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 07:48 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर
1

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
3

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
4

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.