Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या

Health News: तपासणीत गंभीर स्थिती आढळलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाते. एप्रिल ते ऑगस्ट २०२६दरम्यान ८२० हृदयशस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्या असून ८१० पूर्ण झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 02:35 AM
राज्यात ६.५८ लाख बालकांमध्ये आरोग्य समस्या

राज्यात ६.५८ लाख बालकांमध्ये आरोग्य समस्या

Follow Us
Follow Us:
  • राज्यात ६.५८ लाख बालकांमध्ये आरोग्य समस्या
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची तपासणी ४३ टक्क्यांवर
  • अंगणवाडीतील ६९ टक्के बालकांची तपासणी
सुनयना सोनवणे/ Health: बालकांमधील आजारांचे लवकर निदान करून त्यांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या २०२६-२७ मधील अंमलबजावणीची स्थिती समोर आली आहे. १ एप्रिल ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील आकडेवारीनुसार, राज्यात अंगणवाडीतील ४१ लाख २८ हजार ६७४ बालकांची, तर शाळांमधील ५३ लाख ५५ हजार ४३१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. या तपासण्यांमध्ये ६ लाख ५८ हजार ३८४ बालकांमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळल्या आहेत.

या कार्यक्रमाची सुरुवात फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आली. जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये जन्मजात व्यंग, बालपणातील आजार, कमतरता आणि विकासात्मक विलंब या चार बाबींचे लवकर निदान करण्यावर कार्यक्रमाचा भर आहे. नवजात बालकांची जन्माच्या ठिकाणी, सहा आठवडे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत आणि सहा ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची शासकीय व अनुदानित शाळांमध्ये तपासणी केली जाते.

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

अंगणवाडी तपासणी ६९ टक्के

अंगणवाडीतील ६० लाख ९ हजार ७५६ बालकांच्या तपासणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४१ लाख २८ हजार ६७४ बालकांची तपासणी झाली असून, उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ६९ टक्के आहे. तसेच १ लाख १० हजार ३६४ अंगणवाडी केंद्रांपैकी ८९ हजार ४२ केंद्रांची तपासणी झाली असून, केंद्र तपासणीचे प्रमाण ८० टक्के आहे.

शालेय तपासणी ४३ टक्क्यांवर

शाळांमधील तपासणी तुलनेने कमी झाली आहे. १ कोटी २४ लाख ४३ हजार ८८९ विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट असताना ५३ लाख ५५ हजार ४३१ विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. त्यामुळे तपासणीचे प्रमाण ४३ टक्के आहे. राज्यातील ८८ हजार २७८ शाळांच्या तपासणीचे उद्दिष्ट असताना ५९ हजार ४९४ शाळांमध्ये तपासणी झाली असून, हे प्रमाण ६७ टक्के आहे.

उपचाराच्या टप्प्यावर शस्त्रक्रियांना गती –

तपासणीत गंभीर स्थिती आढळलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाते. एप्रिल ते ऑगस्ट २०२६दरम्यान ८२० हृदयशस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्या असून ८१० पूर्ण झाल्या आहेत. इतर शस्त्रक्रियांसाठी निश्चित केलेल्या ७२५९ पैकी ७२५२ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय

राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ११९६ मोबाइल आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एक एएनएम आणि एक औषधनिर्माता असतो. तसेच १ एप्रिल २०२६पासून आरबीएसके २.० पोर्टल सुरू करण्यात आले असून, मोबाइल आरोग्य पथक, जिल्हा आरबीएसके आणि राज्य आरबीएसके अशा तीन स्तरांवर त्याचा वापर केला जात आहे.

महत्त्वाची आकडेवारी-

अंगणवाडी बालकांचे उद्दिष्ट : ६०,०९,७५६
अंगणवाडी तपासणी : ४१,२८,६७४ (६९%)
शालेय विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट : १,२४,४३,८८९
शालेय तपासणी : ५३,५५,४३१ (४३%)
आरोग्यविषयक समस्या आढळलेली बालके : ६,५८,३८४
हृदयशस्त्रक्रिया पूर्ण : ८१०
इतर शस्त्रक्रिया पूर्ण : ७,२५२
मोबाइल आरोग्य पथके : १,१९६

Web Title: Childrens health in maharashtra 94 million screened health issues found in 658000 children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Anganwadi
  • Health News
  • Maharashtra Health Department
  • pune news

संबंधित बातम्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
1

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
2

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
3

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
4

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.