Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Issue News: शाहूपुरीतील पाणीपुरवठा पिवळसर! दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात? जाणून घ्या उपाययोजना

पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 24, 2026 | 10:44 AM
Satara News, Water Contamination, Shahupuri Water issue, Public Health,

Satara News, Water Contamination, Shahupuri Water issue, Public Health,

Follow Us
Follow Us:
  • शाहूपुरी भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा
  • गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात अशा प्रकारचा पाणीपुरवठा
  • आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
Satara News: शहरातील शाहूपुरी भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कण्हेर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणारे पाणी दूषित असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

शाहूपुरीतील रहिवासी भारत विजयसिंह भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यांनी नमूद केले की, गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात अशा प्रकारचा पाणीपुरवठा होत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून फिल्टर टाकी व जलसाठा टाक्यांची स्वच्छता करावी, तसेच पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासून घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी पिण्यायोग्य असल्यास त्याबाबत अधिकृत माहिती वर्तमानपत्रांद्वारे जाहीर करावी, जेणेकरून नागरिकांची भीती दूर होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

पिवळसर पाणीपुरवठा: कारणे आणि उपाय

नळाला पिवळसर पाणी येणे ही एक सामान्य समस्या असली तरी ती आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्षित करून चालणार नाही. या समस्येची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत:

पिवळसर पाणी येण्याची प्रमुख कारणे

गंजलेल्या जलवाहिन्या आणि लोखंडी पाईप्स : घराच्या अंतर्गत जलवाहिन्या किंवा मुख्य जलवाहिनी लोखंडी असल्यास, कालांतराने त्या गंजतात. गंज पाण्याचे रंग बदलतो.

जलसाठ्यातील गाळ: पावसाळ्यात किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावर पाण्यात माती व गाळाचे प्रमाण वाढल्याने पाण्याला पिवळसर किंवा तांबूस रंग येतो.

खनिजांचे प्रमाण: पाण्यात लोह (Iron) किंवा मँगनीजचे प्रमाण वाढल्यास ऑक्सिडेशनमुळे पाणी पिवळे दिसू लागते.

रिपेअरिंग कामे: जलवाहिनी फुटल्यास किंवा दुरुस्तीचे काम सुरू असल्यास आसपासची माती त्या पाण्यात मिसळ्याने दूषित पुरवठा होऊ शकतो.

 

प्रभावी उपाययोजना

पाणी वाहू देणे: जर पाणी पिवळे येत असेल, तर काही मिनिटे नळ सुरू ठेवावा. अनेकदा साचलेला गंज निघून गेल्यावर स्वच्छ पाणी येऊ लागते.

गाळणे आणि उकळणे: पिण्यासाठी पाणी वापरण्यापूर्वी ते सुती कापडाने गाळून घ्यावे आणि किमान २० मिनिटे उकळावे, ज्यामुळे जंतू नष्ट होतात.

टँकची स्वच्छता: घरावरील किंवा जमिनीखालील पाण्याची टाकी दर सहा महिन्यांनी व्यावसायिक यंत्रणेद्वारे साफ करून घ्यावी.

फिल्टरचा वापर: पाण्यात खनिजांचे प्रमाण जास्त असल्यास ‘वॉटर प्युरिफायर’ किंवा ‘आयरन रिमूव्हर’ बसवणे फायदेशीर ठरते.

पाईपलाईन बदलणे: जर अंतर्गत गंज लागला असेल, तर जुन्या लोखंडी पाईप्सऐवजी पीव्हीसी (PVC) किंवा सीपीव्हीसी (CPVC) पाईप्स बसवावेत.

 

Web Title: Health risks loom in satara yellow water supply sparks concern among shahupuri locals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Drinking Water
  • maharashtra news
  • Satara News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
3

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर
4

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.