
CIDCO : सिडकोचा मोठा निर्णय! प्रत्येक नोडमध्ये 24 तास पाणी बंद; 2 नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात लागू
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिडको प्रशासनाने (CIDCO) आपल्या कार्यक्षेत्रात 15 टक्के पाणीकपात लागू केली आहे. 2 नोव्हेंबर 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून एकदा 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पुढील आदेश मिळेपर्यंत ही पाणीकपात कायम राहणार आहे. त्यामुळे खारघर, उलवे, तळोजा, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, करंजाडे आणि द्रोणागिरीसह सिडको क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
गतवर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात कमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही संभाव्य अल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने 5 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन आणि प्राधान्यक्रमाने व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाच्या अनुषंगाने सिडकोनेही पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी 15 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. नोडनिहाय पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
सिडकोने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विविध नोडमध्ये पुढीलप्रमाणे 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एकदिवस पाणीपुरवठा बंद असणारे नोड / परिसर
सोमवार – खारघर, नवीन पनवेल (पूर्व)
मंगळवार – उलवे सेक्टर 2, 3, 5, 6, 19, 20, 22, 23, 24, 25, 25-अ, गव्हाण, कोपर, मोरावे; नवीन पनवेल (पश्चिम)
बुधवार – कळंबोली
गुरुवार – करंजाडे
शुक्रवार – तळोजा, कळुंद्रे, कामोठे
उलवेचे काही सेक्टर, शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर, न्हावा खाडी तसेच द्रोणागिरीतील नमूद सेक्टर व गावांचा परिसर.
अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन CIDCO Implements 15% Water Cut Across Its Nodes; Appeals to Citizens for Judicious Use of Water 24-hour water supply shutdown once a week in each node; citizens urged to conserve drinking water #cidcoupdate #watercut — CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) November 2, 2026
पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतेपुरता करावा, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच घरातील आणि सोसायटीतील पाण्याच्या टाक्या भरून वाहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नळ किंवा जलवाहिन्यांमधून गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी. आवश्यकता नसताना नळ सुरू ठेवू नयेत. साठवलेले पाणी केवळ शिळे झाले आहे, या समजुतीने फेकून देऊ नये. शहरातील जलतरण तलावांसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन काटकसरीने वापर करावा. पाणीगळती रोखणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
Ans: सिडको प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रात 15 टक्के पाणीकपात लागू केली आहे.
Ans: 2 नोव्हेंबर 2026 पासून पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
Ans: प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून एकदा 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.