Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादेत कापड दुकानाला भीषण आग, इतर दुकानांतही आग भडकण्याची शक्यता; अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी

रविवारी दुपारी शहागंज येथील न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 15, 2023 | 04:24 PM
औरंगाबादेत कापड दुकानाला भीषण आग, इतर दुकानांतही आग भडकण्याची शक्यता; अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद – आज मकर संक्रांतीच्या दिवशीच गजबजलेल्या शहागंज परिसरात एका होलसेल कापड दुकानाला भीषण आग लागली. संक्रांतीमुळे नेहमीपेक्षा अधिक ग्राहकांची कापड खरेदीसाठी गर्दी झालेली असतानाच ही दुर्घटना झाली. त्यामुळे शहागंज परिसरात खळबळ उडाली.

अग्निशमनदलाच्या 7 गाड्या घटनास्थळी

दुपारी या कापड दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग लागलेल्या दुकानाच्या आजुबाजूला इतरही मोठ-मोठी होलसेल कापड दुकाने आहेत. त्यामुळे ही आग इतर दुकानांपर्यंत जाऊ नये, यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

परिसरात धुराचे लोट

रविवारी दुपारी शहागंज येथील न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे 7 बंब दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

इतर दुकानांतही आग भडकण्याची शक्यता

मात्र, आग मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज परिसरात कपडा मार्केट आहे. आजूबाजूला मोठमोठी कापडाची होलसेल दुकान आहेत. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Heavy fire at cloth shop in aurangabad possibility of fire in other shops 7 firefighters at the scene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 04:24 PM

Topics:  

  • Aurangabad news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती
1

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
2

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
3

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख
4

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.