File photo : Mumbai Train
मुंबई : मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून, पुढील चार दिवस आणखी पाऊस सुरू राहणार असल्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील सर्वच गाड्या धिम्या गतीने जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसत आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे रेल्वेसेवेवर याचा परिणाम होत आहे. काही रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे सांगितले जात आहे.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी…
मुंबईला शनिवारी, तर ठाणे जिल्ह्याला सगल दोन दिवस शुक्रवार, शनिवार ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला सलग तीन दिवस शनिवार, रविवार, सोमवार ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.