Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांना मनस्ताप! मुंबई–पुणे द्रुतगती Traffic Jam; बोर घाटात वाहनांचा मोठा खोळंबा अन्…

पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2025 | 07:44 PM
प्रवाशांना मनस्ताप! मुंबई–पुणे द्रुतगती Traffic Jam; बोर घाटात वाहनांचा मोठा खोळंबा अन्...

प्रवाशांना मनस्ताप! मुंबई–पुणे द्रुतगती Traffic Jam; बोर घाटात वाहनांचा मोठा खोळंबा अन्...

Follow Us
Close
Follow Us:
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मोठा खोळंबा
बोर घाटात प्रचंड वाहूक कोंडी 
सुट्ट्या असल्याने गर्दी वाढल्याचा अंदाज

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बोर घाट परिसरात शनिवारी सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळा, खंडाळा परिसरात सुट्टीचा दिवस, थंड हवामान आणि निसर्गरम्य वातावरणाचा (Weather) आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळल्याने द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी बोर घाटात काही काळ वाहतूक अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळपासूनच मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. विशेषतः कार, खासगी प्रवासी वाहने आणि पर्यटन बस यांची संख्या वाढल्याने बोर घाटातील अरुंद वळणांवर वाहतूक संथ गतीने सरकू लागली. काही ठिकाणी वाहनांचे छोटे अपघात तसेच रस्त्याच्या कडेला बिघडलेली वाहने यामुळे खोळंबा अधिक वाढला. लोणावळा व खंडाळा परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही गर्दीचा ताण जाणवत होता. भुशी धरण, लायन पॉइंट, टायगर पॉइंट, कार्ला–भाजे लेणी या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली.

पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले. बोर घाट परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही काळ जड वाहनांना थांबवण्यात आले, तर वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, वाहनांची संख्या प्रचंड असल्याने प्रवाशांना बराच वेळ खोळंबा सहन करावा लागला.

प्रवास सुखकर होणार! पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय

पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सुटणार

अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठीच्या उपाययोजना व नियोजना पीएमआरडीए‘च्या बुधवारी झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर ३० मीटर रस्ते प्रादेशिक आराखड्यानुसार तयार करण्यात येईल. त्यानुसार, खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे.

वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली -केसनंद  बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही डॉ. म्हसे यांनी निर्देशित केले.

Web Title: Heavy traffic jam in bor ghat old mumbai pune highway due to weekend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • highway news
  • Pune Traffic
  • traffic jam

संबंधित बातम्या

पुणे विमानतळ रस्त्यावरचा वाहतुकीचा प्रश्न आता लवकरच सुटणार; प्रशासनाकडून उचलले जाणार ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल
1

पुणे विमानतळ रस्त्यावरचा वाहतुकीचा प्रश्न आता लवकरच सुटणार; प्रशासनाकडून उचलले जाणार ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.