Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डिकसळ’वरील अवजड वाहतूक बंद ; दीडशे वर्षांपूर्वीच्या पुलाचे दगडी बांधकाम निखळले

पुणे आणि सोलापूर (Pune- Solapur)जिल्ह्यांना  जोडणारा दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल  सोमवार( दि. १०)  पासून  अवजड वाहतुकीसाठी  कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  तसेच  प्रशासनाच्यावतीने पुलावर  मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावून अवजड वाहतूक बंद केली.

  • By Aparna
Updated On: Oct 11, 2022 | 01:40 PM
‘डिकसळ’वरील अवजड वाहतूक बंद ; दीडशे वर्षांपूर्वीच्या पुलाचे दगडी बांधकाम निखळले
Follow Us
Close
Follow Us:

भिगवण : पुणे आणि सोलापूर (Pune- Solapur)जिल्ह्यांना  जोडणारा दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल  सोमवार( दि. १०)  पासून  अवजड वाहतुकीसाठी  कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  तसेच  प्रशासनाच्यावतीने पुलावर  मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावून अवजड वाहतूक बंद केली.सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या या पुलाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी निखळू लागले होते.  स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंट आणि विटांचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात त्याची डागडुजी केली होती. मात्र, हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी  लावून धरली होती.

करमाळा तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील लोकांना पुणे व मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होत होता. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड ऍग्रो, इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.  त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता.  म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी  करून पुन्हा चालू केला होता.  आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.

-ऊस, वाळूसाठी वाहतूक पुन्हा सुरु होण्याची चर्चा
मात्र,  या पुलावरून मोठ्या प्रमाणात ऊस आणि वाळू  वाहतूक होत असल्याने हा पूल जास्त दिवस बंद राहणार नाही.  कारण या भागातील ऊस हा पुणे जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या   साखर कारखान्यांना जात असल्यामुळे हा पूल लगेच काही दिवसात पुनःश्च सुरू केला जाईल,  अशी चर्चा  या भागातील नागरिकांत सुरू आहे.

-दुर्घटना होऊ नये यासाठी अवजड वाहतूक बंद
दरम्यान, सध्या उजनी धरण तुडुंब भरले असून धरणा त ११७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोकणातील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही अघटीत घटना घडू नये, म्हणून हा पूल प्रशासनाने जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Heavy traffic stop on dikasal the stonework of the bridge 150 years ago was dislodged nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 01:39 PM

Topics:  

  • Bhigwan
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
2

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
3

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.