Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसला ‘नॉट अलाऊड’; सर्व याचिका फेटाळल्या

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व प्रलंबित याचिका फेटाळल्या. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत शिस्त आणि रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 09:56 PM
उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसला 'नॉट अलाऊड'

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसला 'नॉट अलाऊड'

Follow Us
Follow Us:
  • सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसवर न्यायालयाची स्पष्ट मनाई
  • सर्व प्रलंबित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा
 

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाजगी वैद्यकीय व्यवसायाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या विषयावर दाखल करण्यात आलेल्या विविध प्रलंबित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि राज्य सरकारच्या विद्यमान धोरणांनुसार शासकीय वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ सरकारी सेवेसाठी नियुक्त असतात. त्यामुळे त्यांनी आपला संपूर्ण वेळ आणि कौशल्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी वापरणे अपेक्षित आहे.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. अशा परिस्थितीत सरकारी सेवेसोबत खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देणे नियमांच्या आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी सरकारी डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने हा निर्णय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी न्यायालयात बाजू मांडली. तसेच आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे, युक्तिवाद आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडत शासनाच्या बाजूला सहकार्य केले.

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप

कायदेतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय केवळ शासकीय सेवेत शिस्त राखणारा नाही, तर रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. आरोग्य विभागानेही या निर्णयाचे स्वागत करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि रुग्णहित अधिक मजबूत होण्यास यामुळे मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: High court bans private practice government medical officers maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • doctors
  • Doctors News

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क
2

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
3

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
4

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.