सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! (Photo Credit- X)
ऑर्थोपेडीक विभागात चालत असल्याचे आरोपांवरून समोर आले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तब्बल १५ कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांना (डीन) दिलेल्या सामायिक पत्रात म्हटले आहे की, डॉ. महाजन यांच्या जेवणावळी, महागडी घड्याळे, इयरफोन्स आणि सण-उत्सवांतील भेटवस्तूंचा वैयक्तिक खर्च निवासी डॉक्टरांवर सक्तीने टाकला जातो. तसेच, नाव न छापण्याचा अटीवरून एका निवासी डॉक्टर यांनी म्हटले आहे की, ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या स्वतंत्र पत्रात या बेकायदेशीर आणि वैयक्तिक कामांमुळे आपण नैराश्यात गेलो असल्याचे धक्कादायक वास्तव मांडण्यात आले आहे. जे विद्यार्थी या आर्थिक लुटीला आणि वैयक्तिक कामांना नकार देतात, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून अपमानास्पद वागणूक दिली जाते, असाही आरोप या पत्रांमध्ये करण्यात आला आहे.
या सर्व गैरकारभाराचा सर्वात भयंकर फटका एका निष्पाप रुग्णाला बसल्याचा खळबळजनक आरोप एका घटना अहवाल (इन्सीडन्स रिपोर्ट)मध्ये नमूद करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भास्कर मुगम या अत्यंत गंभीर जखमी रुग्णाला डॉ. महाजन यांच्या युनिटमध्ये दाखल करून घेण्यास व वेळेवर उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याला योग्य संदर्भ पत्रांविनाच सायन आणि केईएम रुग्णालयात रेफर करून वाऱ्यावर सोडण्यात आले. या वेळेच्या अपव्ययामुळे आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे केईएम रुग्णालयात त्या रुग्णाचा पाय कापावा लागला आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. एका प्राध्यापकाच्या बेजबाबदारपणामुळे व प्रवेश नाकारल्यामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याच्या या अत्यंत संतापजनक घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
मुंबईत उघड्यावर कचरा फेकलात तर खैर नाही! CCTVच्या निगराणीखाली दंडात्मक कारवाई
भ्रष्टाचाराची आणि मनमानी कारभाराची ही साखळी इथेच थांबत नाही, तर यात थेट बनावटगिरी (फोर्जरी)चाही समावेश असल्याचा आरोप आहे. ५ मार्च २०२६ रोजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे धाव घेत एक गंभीर तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय त्यांचे पदव्युत्तर मार्गदर्शक (पीजी गाईड) बदलून डॉ. महाजन यांची नियुक्ती करण्यासाठी कागदपत्रांवर विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) अत्यंत अनादरपूर्वक वर्तन करून विभागात हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केल्याचेही आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
२०१९ च्या एका चौकशी अहवालानुसार डॉ. महाजन यांचा पूर्वेतिहासही वादग्रस्त राहिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. कांता राजू एच या विद्यार्थ्याला प्राध्यापकांमधील वैयक्तिक मतभेद आणि अंतर्गत राजकारणातून जाणीवपूर्वक प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करण्यात आले होते, असा थेट निष्कर्ष डॉ. विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने काढला होता. वारंवार विद्यार्थ्यांना वेठीस धरणे, प्रबंधाचे विषय न देणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे अशा प्रवृत्तींमुळे विभागात संतापाची लाट आहे. या सर्व पुराव्यांच्या आणि लेखी तक्रारींच्या आधारे आता या प्रकरणाची अत्यंत सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी केली जात आहे.
आर्थिक लूट आणि शोषण: डॉ. नितीन महाजन यांच्याकडून महागड्या भेटवस्तू, वैयक्तिक घड्याळे आणि जेवणावळीसाठी १५ निवासी डॉक्टरांवर आर्थिक दबाव टाकल्याचा थेट आरोप (तक्रार दिनांक: ६ फेब्रुवारी २०२६).
हलगर्जीपणाने रुग्णाचा बळी: भास्कर मुगम या रुग्णाला वेळेवर उपचार न दिल्याने आणि प्रवेश नाकारून इतरत्र पाठवल्यामुळे पाय कापावा लागला व नंतर मृत्यू झाल्याचा ‘इन्सीडंट रिपोर्ट’ मध्ये गंभीर आरोप.
बनावट सह्यांचे प्रकरण: विद्यार्थ्यांच्या संमतीविना कागदपत्रांवर बनावट सह्या करून पीजी मार्गदर्शक बदलल्याच्या प्रकरणाची थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे ५ मार्च २०२६ रोजी तक्रार.
मानसिक छळ: निवासी विद्यार्थ्यांचा वैयक्तिक कामांसाठी मानसिक छळ; विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रबंध विषय न देता सूडबुद्धीने वागणूक दिल्याची चर्चा.
वादग्रस्त पूर्वेतिहास: २०१९ मध्येही अंतर्गत राजकारणातून एका विद्यार्थ्याला (डॉ. कांता राजू) जाणीवपूर्वक नापास केल्याचा तत्कालीन चौकशी समितीचा ठपका.
या सर्व प्रकरणाबाबत माहिती घेऊन संबधित विभागात चौकशी करून योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल. -डॉ.अजय भंडारवार (अधिष्ठाता सर जे.जे.रुग्णालय) संबधित निवासी डॉक्टराना वरिष्ठ डॉक्टरांकडुन होत असलेल्या त्रासाबाबत माहिती घेण्यात येईल व या प्रकरणी मार्ड संघटना डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. -डॉ. विनायक शहा (अध्यक्ष, मार्ड संघटना, सर जे.जे.रुग्णालय)
एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण






