Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका; जाचक निर्बंध रद्द

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राज्य सरकारने लादलेले जाचक निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 10, 2026 | 12:42 PM
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी काही अटीं
  • उच्च न्यायालयाकडून १ किमी भौगोलिक मर्यादा आणि शाळा निवड मर्यादेला स्थगिती
  • सरकारी शाळा जवळ असल्या तरी, खासगी विनाअनुदानित शाळांनी वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश देणे बंधनकारक
Right To Education: राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी काही अटींसह अधिसूचना जारी केली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत एक अधिसचूना जारी केली होती. या शाळेच्या १ किमी परिघात राहणाऱ्यांनाच RTE अंतर्गत प्रवेश दिला जाईल, असे नमुद करण्यात आले होते. पण या अधिसूचनेला आव्हान देत आशिष फुलझेले, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या जाटक अटींना विरोध केला होता.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशांवर लादलेल्या १ किमी भौगोलिक मर्यादा आणि शाळा निवड मर्यादेला स्थगिती दिली आहे. सरकारचे हे पाऊल केवळ मागील न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करत नाही तर मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचेही उल्लंघन करते, असे न्यायमूर्तींना म्हटले आहे.

Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण

अंमलबजावणीवर अनेक कडक निर्बंध

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राज्य सरकारने लादलेले जाचक निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

न्यायालयाने रद्द केलेल्या प्रमुख तरतुदी:

ऑनलाइन प्रणालीमध्ये गुगल मॅप्सद्वारे निवासस्थानापासून केवळ १ किलोमीटरच्या परिघातील शाळा दिसतील, हा निर्बंध न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच, पालकांना जास्तीत जास्त १० शाळा निवडण्याची असलेली सक्ती आणि केवळ जवळच्या शाळा पोर्टलवर दिसणे, या तरतुदीही रद्द करण्यात आल्या आहेत.

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

न्यायालयाची कडक निरीक्षणे:

सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, हे निर्बंध १९ जुलै २०२४ रोजी ‘अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा’ प्रकरणात दिलेल्या निकालाचे उल्लंघन आहेत. आरटीई कायद्याच्या कलम १२(१)(क) मध्ये अंतराची कोणतीही अट नाही. कोणताही सरकारी नियम मूळ कायद्याला (Main Act) रद्द करू शकत नाही. सरकारी शाळा जवळ असल्या तरी, खासगी विनाअनुदानित शाळांनी वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. सरकारचे हे निर्बंध संविधानाच्या कलम १४, २१ आणि २१अ (शिक्षणाचा अधिकार) च्या विरोधात आहेत.

याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील जयना कोठारी, पायल गायकवाड आणि अधिवक्ता दीपांकर कांबळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आपल्या ऑनलाइन प्रणालीमध्ये तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून कायद्यानुसार गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

 

Web Title: High court quashes oppressive restrictions imposed by state government on rte admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • High court
  • right to education
  • State Governments

संबंधित बातम्या

‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
1

‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला डॉक्टरला दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने मिळणार MBBS पदवी
2

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला डॉक्टरला दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने मिळणार MBBS पदवी

Telegram ला दिल्ली हायकोर्टाचा दणका! याचिका फेटाळत दिला ‘हा’ मोठा निर्णय
3

Telegram ला दिल्ली हायकोर्टाचा दणका! याचिका फेटाळत दिला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.