इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या कमतरतेमुळे तेल मंत्रालयाने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. (फोटो - istock)
कच्चे तेलाची आयातीवर परिणाम झाल्यामुळे तेल आणि गॅस वापरावर याचा परिणाम झाला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात ही कमतरता गंभीर संकट निर्माण करत आहे. उद्योग संघटनांनी इशारा दिला आहे की जर पुरवठा लवकर पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांतच भोजनालये आणि रेस्टॉरंट्स बंद होऊ शकतात.
हे देखील वाचा : केंद्र सरकारकडून दिलासा; LPG चे उत्पादन वाढवण्याचे दिले आदेश, ‘सर्वसामान्यांना प्राधान्य द्या…
संकट कसे सुरू झाले?
मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सौदी अरेबियासारख्या देशांमधून भारताच्या ८५-९०% एलपीजी आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी व्यावसायिक गॅसची कमतरता वाढत आहे.
या संकटातून बाहेर येण्यासाठी तेल मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तेल मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली आहे. तेल मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी पुरवठ्याशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या तीन कार्यकारी संचालक असलेल्या टास्क फॉर्सची स्थापना करण्यात आली आहे. भारतात दरवर्षी ३.१३ कोटी टन एलपीजीचा वापर होतो. यापैकी ८७% घरगुती स्वयंपाकघरात आणि १३% हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरला जातो. एकूण मागणीपैकी ६२% आयातीद्वारे पूर्ण केली जाते.
सरकारकडून घेतली जात आहे खबरदारी
पेट्रोकेमिकल उत्पादन कमी करून एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश तेल मंत्रालयाने रिफायनरीजना दिले आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरसाठी बुकिंग कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच केवायसी असणाऱ्या ग्राहकांना गॅस दिला जाणार आहे. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक असलेल्या क्षेत्रांसाठी आयात केलेल्या एलपीजीला प्राधान्य दिले जात आहे.
उद्योगावर परिणाम
मीडिया रिपोर्टनुसार, गॅस सेवा पुरवठा खंडित होण्याचा परिणाम मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आधीच दिसून येत आहे. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी टंचाई वेगाने पसरत आहे आणि लवकरच संपूर्ण क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम
आजचे एलपीजी सिलिंडरचे दर
व्यावसायिक सिलिंडर –






