Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा पोटनिवडणुकीत आज हिंदू महासंघाच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय; काय आहे कारण?

काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2023 | 11:53 AM
कसबा पोटनिवडणुकीत आज हिंदू महासंघाच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय; काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कसबा (Kasba) विधानसभा पोटनिवडणुकीचा (Election) प्रचाराला जोर चढला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून (Bjp) विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना (Girish Bapat) प्रचार रिंगणात उतरवले आहे. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आनंद दवे नेमकं काय म्हणाले ?

काल गिरीश बापट यांना प्रचार करताना पाहिले. ते ऑक्सिजन लावून प्रचारासाठी आले होते. त्यांना पाहून मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आठवले. त्रास बापट साहेबांना होत होता… पण यातना आम्हाला जाणवत होत्या. त्यामुळे आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं आनंद दवे म्हणाले.

दरम्यान, काल गिरीश बापट कसब्यात प्रचारासाठी आले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत बापट यांनी भाग घेतला. यावेळी बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. हाताला ऑक्सिमीटर लावले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती. तरीही बापट प्रचारासाठी आले होते.

Web Title: Hindu federation candidates stance of not campaigning in kasba by election today what is the reason nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2023 | 11:44 AM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Girish bapat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
1

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका
2

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल
3

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
4

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.