Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: देशाच्या सुरक्षेसाठी बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणे आवश्यक; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

साताऱ्यात हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आला विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2025 | 09:23 PM
Satara News: देशाच्या सुरक्षेसाठी बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणे आवश्यक; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
सातारा:  महाराष्ट्रामध्ये तब्बल 55 ते 60 लाख बांगलादेशी अवैध रित्या राहत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांना देशातून हद्दपार करणे आवश्यक आहे. तसेच इतर पुरोगामी संघटना त्यावर होणारा अत्याचारा संदर्भात मूग गिळून गप्प बसतात याबाबत सर्च ऑपरेशन केले जावे अशी मागणी हिंदु राष्ट्र  समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले .
साताऱ्यात हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आला विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते.  मोर्चाची सुरुवात बाळकृष्ण निकम यांनी केलेल्या शंख नादाने झाली तसेच साताऱ्याच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

बांगलादेशी तस्करांना हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चामध्ये हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप विश्व हिंदू परिषद विजय गाढवे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे शिवाजी तुपे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सुनील घनवट जिल्हा समन्वयक हेमंत सोनवणे इत्यादी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना घनवट म्हणाले भारतातून सर्व बांगलादेशी नागरिकांना बाहेर घालवले पाहिजे वर्ष 2025 मध्ये 16 मे हा अखेरचा दिवस ठरला पाहिजे युवकांना जर आरक्षणामुळे 25000 रोजगार मिळत असतील तर बांगलादेशी  हटवल्यावर किमान 80 लाख रोजगार उपलब्ध होतील प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून या घुसखोराविरोधात मोहिम उभारली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली.

स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले

पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी असून, वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना स्वारगेट परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे. महर्षीनगर भागात ही कारवाई केली असून, मध्यभागातूनच बांगलादेशीला पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले

डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक

भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजुला कोळेगाव आहे. कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील चाळीत या तीन महिला राहत होत्या. कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले. या महिला कोळेगावात राहतात का, त्या कोणत्या व्यवसाय करतात याची पहिले गुप्त माहिती काढली. या माहितीची खात्री झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक कोळेगावात दाखल झाले. त्यांनी महिलांना ताब्यात घेतले.

Web Title: Hindutva organizations demand bangladeshi infiltrators deported for the security of the india satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Satara News

संबंधित बातम्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
1

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
2

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
3

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
4

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.