Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

बारावी परीक्षेच्या बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र हिंगोलीमधील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्यामुळे अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2026 | 05:38 PM
दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

Hingoli News : वसमत : बारावीच्या परीक्षेदरम्यान (HSC Exam) केंब्रिज कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद राहिल्याचा आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनोळखी शिक्षकाविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी केवळ सीसीटीव्ही बंद असल्याच्या आधारावर निष्कर्ष काढणे योग्य ठरेल का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. हिंगोली जिल्ह्यात (Hingoli News) बारावी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व पोलिस अधीक्षक निलाभरोहन यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा

दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाच्या पेपरवेळी वसमत येथील केंब्रिज कॉलेजच्या केंद्रावर १९ वर्गखोल्यांमध्ये परीक्षा सुरू होली. त्यावेळी दुपारी १२.३६ ते १.१३ या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे फुटेज तपासणीत आढळले. केंद्रप्रमुख तथा पळसगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव नलगे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ व उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो सीसीटीव्ही कॅमेरे नेमके का बंद झाले? तांत्रिक बिघाड होता की वीजपुरवठा खंडित झाला होता? परीक्षा केंद्राच्या फीडरवर त्या वेळेत वीज गेली होती का? याची खातरजमा केल्याशिवाय केवळ ‘कॅमेरे बंद’ या आधारावर कॉपीचा ठपका ठेवणे न्याय्य ठरेल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

हे देखील वाचा : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

खरी कारणमीमांसा लवकर होणार स्पष्ट

वीजपुरवठा खंडित झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडणे स्वाभाविक आहे, विशेषतः बैंकअप प्रणाली कार्यरत नसेल तर, त्यामुळे संबंधित कालावधीत वीजपुरवठ्याची स्थिती काय होती, याबाबत महावितरण अधिका-यांकडून अधिकृत नोंदी मागविणे आवश्यक ठरते. फीडर लॉग, ट्रिपिंग रिपोर्ट आणि वीज खंडितीची वेळ यांची पडताळणी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात कोणताही आरोप हा ठोस पुराव्यावरच आधारलेला असावा लागतो. अन्यथा निष्पाप व्यक्तीवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तांत्रिक बिघाड, वायरिंग समस्या किंवा नेटवर्क अडथळा यामुळेही सीसीटीव्ही बंद पडू शकतात, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. कॉपीमुक्त अभियानाला धक्का बसू नये, तसैव निर्दोषांवर अन्यायही होऊ नये-या दुहेरी जबाबदारीची जाणीव ठेवूरव पोलिसांनी आणि शिक्षण प्रशासनाने सखोल, पारदर्शक व तांत्रिक चौकशी करणे गरजेचे आहे.
आता सवचि लक्ष या तपासाकडे लागले असून, सीसीटीव्ही बंद’ प्रकरणामागील खरी कारणमीमांसा काय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा : राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Web Title: Allegations of copying as cctv at 12th exam center in hingoli is off

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Hingoli News
  • HSC Exam 2026
  • nanded news

संबंधित बातम्या

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?
1

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव
2

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता
3

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
4

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.