Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hinjawadi Metro News: हिंजवडी मेट्रो धावण्यासाठी सज्ज!; CMRS ची हिरवी कंदील, १५ ऑगस्टला उद्घाटन

Hinjawadi Metro: हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 03:07 PM
हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला 'हा' नवीन प्लॅन

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला 'हा' नवीन प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • पहिला १२ किमीचा टप्पा (माण ते बालेवाडी स्थानक पूर्ण)
  • c आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड
  • राज्य सरकारच्या प्रमुख नेतृत्वात भव्य सोहळ्याद्वारे लोकार्पण करण्याचे सूक्ष्म नियोजन
Hinjawadi Metro News: शहराची जीवन वाहिनी ठरू पाहणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गातील पहिल्या टप्प्याचा प्रवास आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. करून सुरक्षा तपासणी पूर्ण ‘सीएमआरएस’ (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) कडून प्रवाशी वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी मिळाल्यामुळे हिंजवडी मेट्रो प्रत्यक्षात रुळावर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून आता उद्घाटनाच्या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) च्या मुहूर्तावर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

१२ किमीचा पहिला टप्पा पूर्ण

हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या १२ स्थानकांचा (माण ते बालेवाडी) टप्पा सर्व तांत्रिक व सुरक्षेच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून तयार झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सीएमआरएसची कडक तपासणी पूर्ण झाली असून, तिला मंजुरी मिळाली आहे.

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

प्रशासनाकडून भव्य तयारी

पुण्यातील यापूर्वीच्या मेट्रो टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या प्रमुख नेतृत्वाखाली अतिशय दिमाखात झाले आहे. याच परंपरेला अनुसरून हिंजवडी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उ‌द्घाटनहीं एका मोठ्या सोहळ्याद्वारे नागरिकांच्या स्वाधीन करण्याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे मेट्रोच्या संदर्भातील सर्व आवश्यक फायली आणि औपचारिक प्रक्रिया पाठवण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांना ही विशेष भेट देण्यासाठी प्रशासन सूक्ष्म स्तरावर नियोजन करत आहे.

मेट्रोबाबत महत्वाचे मुद्दे

प्रवासी सुरक्षितता प्रथमः सीएमआरएस मंजुरीमुळे मेट्रोच्या सुरक्षेवर शिक्कामोर्तब.
आयटी क्षेत्राला दिलासाः हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या लवकरव सुटणार.
स्वातंत्र्यदिनाची भेटः १५ ऑगस्ट रोजी सेवेत दाखल करण्याचे प्रशासनाचे वेगाने प्रयत्न.

भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली क्षेत्रीय भविष्य निर्वाह आयुक्तांची भेट; कामगारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

आयटी क्षेत्रासाठी नवसंजीवनी

हिंजवडी मेट्रो सुरू झाल्यामुळे दररोज आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती मिळणार आहे. इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणमुक्त प्रवास अशा अनेक दृष्टीने ही मेट्रो पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात एक नवा अध्याय लिहिणार आहे. प्रशासनाकडून लवकरच उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल, ज्यामुळे पुणेकरांचा मेट्रो प्रवासाचा स्वप्नपूर्तीचा क्षण अत्यंत जवळ आला आहे.

 

 

Web Title: Hinjawadi metro gets cmrs approval inauguration expected on 15 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro
  • PMRDA
  • Pune Metro

संबंधित बातम्या

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
1

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.