Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hinjewadi Metro News : हिंजवडी ते बाणेर मेट्रोला कधी मिळणार मुहूर्त? दिवाळीपूर्वी सुरु करण्याची IT कर्मचाऱ्यांची मागणी

हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन तीनचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा मार्ग लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी केली जात आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Sep 24, 2025 | 06:22 PM
Hinjewadi to Balewadi Baner Metro started early by Diwali IT employees demand Pune News

Hinjewadi to Balewadi Baner Metro started early by Diwali IT employees demand Pune News

Follow Us
Close
Follow Us:

Hinjewadi Metro News : पिंपरी: पुणे शहरामध्ये मेट्रो सुरु झाली असून मार्ग विस्तारण्यास देखील मंजूरी देण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ झाली असून पुणेकर मोठ्या उत्साहाने मेट्रोचा वापर करत आहेत. हिंजवडी ते बाणेर या मार्गावरील मेट्रो लवकर सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.  वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने पीएमआरडीएकडे या संदर्भात पाठवले पत्र पाठवले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन तीनचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च २०२६ मध्ये या मार्गावर मेट्रो धावणार आहे. मात्र, हिंजवडी ते बालेवाडीपर्यंत तीन महिन्यांत मेट्रो सुरू होऊ शकते. वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा मार्ग लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी केली जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा बाणेरपर्यंतचा टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करावा, अशी मागणी शहरातील आयटी कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’च्या माध्यमातून पत्राद्वारे ही विनंती केली गेली. परंतु पीएमआरडीए कडून मार्च २०२६ मध्ये संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार असे‌ सांगण्यात आले. हिंजवडी ते बाणेर मेट्रो टप्प्याची वेळेत सुरूवात केल्यास शहरातील आयटी कर्मचाऱ्यांचे प्रवास सुखकर होईल. वाहतूक कोंडी कमी होणे, वेळेची बचत आणि दिवाळी–नाताळच्या निमित्ताने कामगारांना दिलासा मिळेल या सगळ्याच बाबतीत हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या माहितीप्रमाणे मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण मार्गिकेची कार्यवाही सुरू होईल. मात्र, हिंजवडीतील रस्ते व वाहतूक कोंडी पाहता, फक्त हिंजवडी ते बाणेर हा टप्पा लवकर सुरू करणे आवश्यक असल्याचे आयटी कर्मचाऱ्यांचे मत आहे. सध्या हिंजवडी आणि बाणेरमध्ये सुमारे १.५ ते २ लाख आयटी कर्मचारी काम करतात. यातून अनेकजण हिंजवडी, वाकड, बालेवाडी या भागात राहतात. बाणेरपर्यंत मेट्रो सुरू झाल्यास प्रवाशांचे वेळ व प्रवासाचे तास वाचणार आहेत, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर थेट सकारात्मक परिणाम होईल.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तीन आठवड्यांपूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माण ते बालेवाडी (सुमारे १२–१४ किलोमीटर) या टप्प्याची यशस्वी चाचणी पार पडली. या चाचणीने मेट्रो पहिल्यांदाच हिंजवडीच्या बाहेर धावण्यास सुरुवात केली. पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, अंतिम टप्प्यातील स्टेशन व इतर कामे पूर्ण झाली असून, मार्च २०२६ मध्ये संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार आहे.

फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले, “दिवाळी व नाताळच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी ते बाणेर टप्पा लवकर सुरू करावा; त्यामुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. प्रवासाच्या तास व कामाचे वेळ वाचवणे हा सर्वांत मोठा फायदा होईल.” असे त्यांनी मत मांडले आहे.

Web Title: Hinjewadi to balewadi baner metro started early by diwali it employees demand pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • pune metro news
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
1

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
2

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
3

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.