Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेच्या पुणे विभागाची ऐतिहासिक कामगिरी, 5 कोटी प्रवाशांनी केला प्रवास; प्रवासी वाहतुकीतून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात पहिल्यांदाच एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुणे विभागाला मागील आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीतून ६१५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात सरासरी ६४ टक्के वाढ झाली असून, एक हजार १० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2023 | 12:04 PM
रेल्वेच्या पुणे विभागाची ऐतिहासिक कामगिरी, 5 कोटी प्रवाशांनी केला प्रवास; प्रवासी वाहतुकीतून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात पहिल्यांदाच एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुणे विभागाला मागील आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीतून ६१५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात सरासरी ६४ टक्के वाढ झाली असून, एक हजार १० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत पुणे विभागातून सरासरी पाच कोटी प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती वाणिज्य प्रमुख मिलिंद हिरवे यांनी दिली.

पुणे विभागात ७० रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक हे सर्वात मोठे स्थानक असून, उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुण्याचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. प्रवाशांबरोबरच रेल्वेचे उत्पन्न देखील वाढले असून, पुणे रेल्वे विभागाला चालू आर्थिक वर्षात २६ मार्च पर्यंत एकूण एक हजार ५२४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

गतवर्षांच्या तुलनेत उत्पन्नात ३६२ कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. पुणे विभागाचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत प्रवासी वाहतूक असून, या वर्षी प्रवासी वाहतुकीतून एक हजार १० कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६४ टक्के वाढ झाली आहे. पुणे विभागाच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नाने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक, पार्सल आणि इतर माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

[blockquote content=”प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर ठेवलेला विश्‍वास आणि पुणे विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे योगदान यामुळे एक हजार कोटींचा टप्पा ओलांडने शक्‍य झाले आहे.” pic=”” name=”– इंदूराणी दुबे, डीआरएम, पुणे विभाग”]

Web Title: Historic achievement of pune section of railways 5 crore passengers travelled revenue from passenger traffic is so much crores nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2023 | 12:04 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम
2

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास
3

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन
4

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.