Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shakti Act Maharashtra 2026: महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; महाराष्ट्रात सुधारित ‘शक्ती कायदा’ मंजूर

गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना धमकावणे किंवा त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचे प्रमाण वाढले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 25, 2026 | 03:54 PM
Digital Crimes Against Women, Maharashtra Budget Session News

Digital Crimes Against Women, Maharashtra Budget Session News

Follow Us
Follow Us:
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय
  • तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • अॅसिड हल्ला पीडितेची ओळख गुप्त ठेवणे अनिवार्य केले
Shakti Act Maharashtra 2026:  राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कायद्यात राज्याच्या विशेष गरजांनुसार सुधारणा करणारे ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ (ज्याला सुधारित ‘शक्ती कायदा’ म्हटले जात आहे) एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या विधेयकामुळे आता डिजिटल माध्यमातून महिलांचा छळ करणाऱ्यांना आणि अ‍ॅसिड हल्लेखोरांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

AI फेक फोटो आणि व्हिडिओंवर (Deepfakes) आता गुन्हा

तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या साहाय्याने तयार केलेले फेक फोटो, व्हिडिओ (Deepfakes) किंवा अश्लील डिजिटल मजकूर पसरवणे आता गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. सोशल मीडिया, ईमेल किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरून महिलांची बदनामी केल्यास ती आता ‘लैंगिक गुन्ह्या’च्या कक्षेत येईल. अशा प्रकरणांमध्ये केवळ फोटो तयार करणेच नव्हे, तर ते अपलोड करण्याची धमकी देणे हादेखील शिक्षेस पात्र गुन्हा ठरेल.

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग;

अ‍ॅसिड अटॅक पीडितांची ओळख आता राहणार ‘गुप्त बलात्कार पीडितांच्या ओळखीचे संरक्षण करण्यासाठी आधीच कायदेशीर तरतूद होती, मात्र अ‍ॅसिड हल्ला पीडितांबाबत अशी स्पष्ट तरतूद केंद्राच्या मूळ ‘बीएनएस’ कायद्यात नव्हती. महाराष्ट्राने या सुधारणा विधेयकाद्वारे अ‍ॅसिड हल्ला पीडितेची ओळख गुप्त ठेवणे अनिवार्य केले आहे. पीडितेचा सामाजिक सन्मान जपण्यासाठी आणि तिला पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.

३. सोशल मीडियावरील छळाला बसेल लगाम

गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना धमकावणे किंवा त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचे प्रमाण वाढले होते. नवीन सुधारणेनुसार, कोणत्याही डिजिटल माध्यमातून अश्लील संवाद साधणे किंवा ‘स्टॉकिंग’ (पाठलाग) करणे यासाठी कडक दंडात्मक आणि तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना अशा प्रकरणांमध्ये अधिक वेगवान कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Minor Girls Missing: अल्पवयीन मुलींच्या अपहरणात चिंताजनक वाढ; विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

४. ‘शक्ती’ मधील महत्त्वाच्या तरतुदींचे ‘बीएनएस’मध्ये विलीनीकरण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मूळ ‘शक्ती’ विधेयकातील बहुतांश तरतुदी केंद्राच्या नवीन कायद्यात (BNS) आधीच आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या या दोन विशेष तरतुदी (डिजिटल छळ आणि अ‍ॅसिड अटॅक पीडितांची गोपनीयता) केंद्राच्या कायद्यात नव्हत्या. त्यामुळे राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या समितीच्या शिफारशीनुसार या सुधारणा घडवून आणल्या आहेत.

५. जलद न्याय प्रक्रियेवर भर

या नवीन सुधारणांमुळे महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांची सुनावणी जलद गतीने (Fast-track) होईल. पुराव्यांच्या संकलनासाठी आणि तपास पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा आखून देण्यात आली आहे, ज्यामुळे पीडितेला वेळेत न्याय मिळणे शक्य होईल.

 

Web Title: Historic move maharashtra passes revised shakti act to tackle deepfakes acid attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.