Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांची 'सिल्व्हर ओक'वर भेट घेतली. फुटीनंतरची ही पहिलीच भेट असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 09:01 PM
सुनील तटकरे थेट 'सिल्व्हर ओक'वर (Photo Credit - X)

सुनील तटकरे थेट 'सिल्व्हर ओक'वर (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • राजकारणात मोठी खळबळ!
  • सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर
  • शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून कधी काय घडेल काय सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याचे सांगण्यात येत असून, या भेटीच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

केवळ प्रकृतीची विचारपूस की राजकीय रणनीती?

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. “पवार साहेबांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. या भेटीमागे कोणताही राजकीय उद्देश नाही,” अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ही भेट केवळ वैयक्तिक नसल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.#SunilTatkare #SharadPawar #NCP pic.twitter.com/wDR7RBwNlz — Navarashtra (@navarashtra) May 12, 2026

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

भेटीच्या ‘टायमिंग’मुळे संभ्रम वाढला

सुनील तटकरे आणि शरद पवार यांची ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत पेच निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुनील तटकरे यांचे नाव नसल्याच्या बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि पटेल यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने त्यांच्या सद्यस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

आसाम दौरा आणि एकजुटीचा प्रयत्न?

काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकत्रितपणे आसामचा दौरा केला होता. पक्षांतर्गत कोणताही वाद नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून झाला असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर लगेचच तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पवार आले…पण ‘भाकरी फिरली’ नाही; साताऱ्यात शरद पवारांचा शांत दौरा

Web Title: Sunil tatkare meets sharad pawar at silver oak political speculations maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.