Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: या काळात केवळ शासकीय स्तरावरील बचत पुरेशी ठरणार नाही. नागरिकांनीही अनावश्यक सोने खरेदी टाळावी, इंधनाचा जपून वापर करावा आणि परदेश प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 12, 2026 | 05:52 PM
Devendra Fadnavis, Fuel Conservation, Maharashtra Politics,

Devendra Fadnavis, Fuel Conservation, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आता केवळ अत्यंत आवश्यक कामासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनेच विमान प्रवास करण्याचे आदेश
  • मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या विभागातील सर्व आढावा बैठका ऑनलाइन घेण्याचे आदेश
  • सरकारी कामासाठी अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर करावा, यासाठी प्रोत्साहन
 

CM Devendra Fadnavis Air Travel Restrictions : देशाच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाची महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने विमान प्रवास करावा असे निर्देश दिले आहेत.

स्वतःचे उदाहरण देताना बावनकुळे म्हणाले की, मी वर्षातून केवळ मोजक्याच वेळा विमान प्रवास करतो. तर बहुतेक कामे ऑनलाईन बैठकीद्वारे पूर्ण करतो. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता वेगवेगळ्या विभागामध्येही दिसू लागला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्देशांचा विविध विभागांमध्ये आधीच परिणाम दिसून येत आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनीदेखील आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना, सर्व आढावा बैठका केवळ ऑनलाइनच माध्यमांतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि यांची बचत व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, इंधनाचा वापर कमी करण्यासाठी, अधिकाऱ्यांना आता अधिकृत कामासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

PM Narendra Modi: “घरून काम करा, पेट्रोल-डिझेल वाचवा”; भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत, मोदींचं स्पष्ट वक्तव्य

डॉलर साठा वाचवण्याचे प्रयत्न

या निर्णयामाहे बाताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. भारताला तेल, वायू, खते, खनिजे, सोने यांसारख्या वस्तूंची आयात करताना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. जागतिक संकट आणि वाढत्या आंततरष्ट्रीय किंमतींमुळे आयातीवरील खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्य सरकारची काटकरसीची भूमिका ही डॉलरची बचत आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

शासकीय कामकाजात बदल

राज्य सरकारचा विश्वास आहे की, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काटकसरीचा आदर्श निर्माण केल्यास नागरिकांमध्येही बचतीबाबत जागरूकता वाढेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद वाढवल्यास प्रशासकीय खर्चात मोठी घट होऊ शकते. भविष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे पाऊल “खबरदारीचा उपाय” म्हणून पाहिले जात आहे.

PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?

जनतेलाही बचतीचे आवाहन

या काळात केवळ शासकीय स्तरावरील बचत पुरेशी ठरणार नाही. नागरिकांनीही अनावश्यक सोने खरेदी टाळावी, इंधनाचा जपून वापर करावा आणि परदेश प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा अवलंब आणि स्थानिक उत्पादनांचा वापर वाढवल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे सरकारचे मत आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेली ही पावले राष्ट्रीय आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राज्य नेतृत्वाची कटिबद्धता दर्शवणारी मानली जात आहेत.

 

Web Title: Devendra fadnavis orders cancellation of japan tour for 12 state ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.