गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद; काँग्रेस अन् पोलिसांमध्ये झटापटी
सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर बुधवारी संसदेत याचे पडसाद उमटले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान सोलापुरात कार्यकर्ते आणि पोलिसात झटापटी झाली.
याबाबत माहीती आशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी एकेरी भाषा वापरत अपमान केला. याविरोधात अमित शहा यांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी, मागणी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन जवळ आंदोलन करून अमित शहा यांच्या पुतळ्यास जोडे मारले.
यावेळी अमित शहा यांच्या विरोधात नीम का पत्ता कडवा हैं, अमित शहा भडवा हैं, अमित शहा माफी मांगो, संघ का संविधान नहीं चलेगा, बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, अशा जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी कार्यकर्ते अमित शहा यांच्या पुतळ्यास जोडेमार करताना पोलिसांशी झटापट झाली.
यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, देशाचे गृहमंत्री तडीपार अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी बोलून आपल्या द्वेषाची आणि मनुवादी वृत्तीची प्रचिती संसदेत दिली आहे. या घटनेवरून भाजप नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येते. ज्या डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. ज्ञानाचे सागर अशी ज्यांची संपूर्ण जगाला ओळख आहे त्या डॉ. बाबासाहेबांचा भाजपला एवढा द्वेष का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नसून, लढवय्या पणाचा दैदिप्यमान, धगधगणारा, ज्वलंत आणि आम्हा सर्वांना सदा सर्वकाळ प्रेरित करणारा प्रेरणेचा, आदर्शाचा अखंड स्त्रोत आहेत. अन्याय, अत्याचार, व दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी बळ देत असतो. तडीपार अमित शहा यांचे हे वक्तव्य संविधानिक पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीच्या नात्याने चुकीचे असून, अमित शाह यांनी याबद्दल माफी मागून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या आंदोलनात प्रदेश चिटणीस संजय हेमगड्डी, विनोद भोसले, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष उमेश सुरते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, बाबुराव म्हेत्रे, एन.के . क्षीरसागर, महेश लोंढे बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तिकोंडा, अँड केशव इंगळे,व्हीजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव, राहुल वर्धा, संजय गायकवाड, लखन गायकवाड, तिरूपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, नागेश म्याकल, परशुराम सतारेवाले, विवेक कन्ना, राजेश झंपले, शिवशंकर अंजनाळकर, संघमित्रा चौधरी, संध्या काळे, शोभा बोबे, सुमन जाधव, सलीमा शेख, मुमताज तांबोळी, किरण सुर्वे, रुपेश गायकवाड, मौलाली शेख इंगळगी, अंकुश बनसोडे, नागनाथ शावणे मुमताज शेख, दत्तात्रय गजभार, सोमनाथ व्हटकर अनिता भालेराव भगवान शिंदे आदी उपस्थित होते.