Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kashedi Ghat Accident: कशेडी घाटात भीषण अपघात! डंपरमध्ये कार घुसल्याने कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कल्याण येथील निकेश बालन नावाच्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 07:28 PM
Kashedi Ghat Accident: कशेडी घाटात भीषण अपघात! डंपरमध्ये कार घुसल्याने कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:
  • कशेडी घाटात कार डंपरखाली घुसून भीषण अपघात
  • कल्याणच्या तरुणाचा मृत्यू
  • आई गंभीर जखमी
Kashedi Ghat Accident News: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात कल्याण येथील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागात घुसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी एक कार कशेडी घाटातील भोगाव हद्दीत आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात कारमधील निकेश बालन (वय अंदाजे ३०, रा. कल्याण) आणि त्यांची आई लीसी बालन (वय ६३) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

मात्र उपचार सुरू असताना निकेश बालन यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या लीसी बालन यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते आणि लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यात अडथळा निर्माण करीत असल्याने क्रेनच्या साहाय्याने कार आणि डंपर बाजूला करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

Best Accident : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Web Title: Horrific accident in kashedi ghat youth from kalyan killed after car rams into dumper mother critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Accident
  • Car Accident

संबंधित बातम्या

धावत्या Tata Sumo वर कोसळली भीषण दरड! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; खळबळजनक Video आला समोर
1

धावत्या Tata Sumo वर कोसळली भीषण दरड! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; खळबळजनक Video आला समोर

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral
2

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
3

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.