Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wari 2026 AI Record: वारीत आले किती वारकरी? एआयने दिले अचूक उत्तर! सोलापूर पोलिसांचा तंत्रज्ञानाचा नवा विक्रम

आषाढी वारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून ३१.९८ लाख (३२ लाख) वारकऱ्यांची अचूक नोंद केली आहे. दुबार मोजणी टाळणारा हा देशातील पहिला प्रयोग ठरला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 27, 2026 | 09:57 PM
वारीत आले किती वारकरी? एआयने दिले अचूक उत्तर (Photo Credit- AI)

वारीत आले किती वारकरी? एआयने दिले अचूक उत्तर (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • वारीत आले किती वारकरी?
  • एआयने दिले अचूक उत्तर!
  • सोलापूर पोलिसांचा तंत्रज्ञानाचा नवा विक्र
पंढरपूर, (वा.): आषाढी वारी २०२६ मध्ये लाखो वारकऱ्यांच्या गर्दीचे अचूक व्यवस्थापन करत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सेंटियंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय प्रणालीच्या माध्यमातून यंदाच्या वारीत तब्बल ३१ लाख ९८ हजार १२९ वारकरी भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे. २४ ते २६ जुलै या तीन दिवसांत पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची ही एआय आधारित मोजणी असून, पारंपरिक पद्धतीतील दुबार मोजणीला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तब्बल १८ लाख ९६ हजार ५७३ वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याची नोंद झाली आहे.

दुबार मोजणीला एआयचा ब्रेक

यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गर्दी मोजताना एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद होण्याची शक्यता होती. मात्र, यंदाच्या एआय प्रणालीने प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र डिजिटल ओळख तयार करून दुबार मोजणी टाळली. त्यामुळे वारकऱ्यांची संख्या अधिक अचूकपणे समोर आली.

पाच प्रवेशद्वारांवर एआयची नजर

पंढरपूर शहरातील सरगम चौक-इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता-दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक-मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक या पाच प्रमुख प्रवेश मार्गांवर एआय कॅमेरे बसविण्यात आले होते. या प्रणालीने व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग, टोपी आणि इतर वैशिष्ट्यांच्या आधारे प्रत्येक वारकऱ्याची स्वतंत्र ओळख निश्चित केली.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला या कारणांसाठी केला जातो उपवास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

शहरात फिरल्यानंतरही तीच ओळख कायम

वारीदरम्यान वारकरी शहरातील वेगवेगळ्या भागांतून फिरत असताना विविध कॅमेऱ्यांमध्ये दिसले तरी एआय प्रणालीने त्यांची एकच ओळख कायम ठेवली. तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांचीही पडताळणी करून पुनर्मोजणी टाळण्यात आली.

भाविकांच्या गोपनीयतेची काळजी

एआय प्रणालीचा वापर करताना भाविकांच्या गोपनीयतेलाही प्राधान्य देण्यात आले. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा तसेच जीडीपीआर नियमांचे पालन करण्यात आले असून, कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर संग्रहित करण्यात आलेली नाही.

तीन दिवसांची एआय आधारित वारकरी संख्या

२४ जुलै २०२६ – ६ लाख ७५ हजार २७४ वारकरी
२५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) – १८ लाख ९६ हजार ५७३ वारकरी
२६ जुलै २०२६ – ६ लाख २६ हजार २८२ वारकरी
एकूण – ३१ लाख ९८ हजार १२९ वारकरी

गर्दी व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा नवा अध्याय

पंढरपूर आषाढी वारी हा जगातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीचा अचूक अंदाज महत्त्वाचा असतो. यंदा एआयच्या मदतीने सुमारे ३२ लाख युनिक भाविकांची अचूक नोंद करण्यात आली. भविष्यात गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. -अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

Web Title: How many warkaris arrived for the wari ai provided the precise answer solapur police set a new record in technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur

संबंधित बातम्या

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; आषाढीनंतर पंढरीतून भक्तांची एक्झिट; रेल्वे, बसस्थानकावर गर्दी
1

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; आषाढीनंतर पंढरीतून भक्तांची एक्झिट; रेल्वे, बसस्थानकावर गर्दी

विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन
2

विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन

Ashadhi Ekadashi : विठ्ठलभक्तीला स्वच्छतेची जोड; सुमीत ग्रूपचा पंढरपुरात स्तुत्य उपक्रम,चंद्रभागेच्या तिरी नियमित स्वच्छता
3

Ashadhi Ekadashi : विठ्ठलभक्तीला स्वच्छतेची जोड; सुमीत ग्रूपचा पंढरपुरात स्तुत्य उपक्रम,चंद्रभागेच्या तिरी नियमित स्वच्छता

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी
4

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.