फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. मात्र आषाढी एकादशीला उपवास का करतात तुम्हाला माहीत आहे का? उपवास करण्यामागे काय कारण आहे. जाणून घ्या आषाढी एकादशीला उपवास का केला जातो.
पूर्वी कुंभ दैत्याचा पुत्र मृदूमान्य नावाच्या दैत्याने कठोर अशी तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने अमर होण्याचा वर मागितला. पण शंकराने त्याला थेट अमरत्व होण्यास नकार दिला. पण तुझा मृत्यू केवळ एखाद्या स्त्रीच्या हातून होईन असा वर दिला.
स्त्री आपल्याला मारू शकणार नाही या अहंकारातून मृदूमान्य मात्र उम्मत झाला. त्याने स्वर्गावरती स्वारी करून सर्व देवांना पराभूत केलं. इंद्रासह आणि देवाचं सगळ राज्य बळकावलं. पराभूत झालेले ब्रम्ह देव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर एका सुरक्षित गुहेत येऊन लपले. देवांनी काही न खाता पिता कठीण असं उपोषण आणि चिंतन केलं त्या गुहेत एकत्र आलेल्या त्रिदेवांच्या श्वासातून आणि तेजातून एक दिवस एका स्त्री शक्तीचा जन्म झाला तिच एकादशी देवता होय.
या देवीने उम्मत झालेल्या दैत्यासोबत युद्ध केले आणि त्याला युद्धामध्ये ठार मारले आणि सर्व देवांची त्याच्या त्रासातून सुटका केली. या एकादशीवरती प्रसन्न होऊनच भगवान विष्णूंने तिला वर दिला की जो मनुष्य या तिथीला तुझा उपवास करेल त्याचा सर्व पाप आणि कष्टांचा नाश होईल तेव्हापासूनच एकादशी व्रत आणि उपवास करण्याची परंपरा सुरू झाली.
भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते.
पापांचे क्षालन होते, अशी श्रद्धा आहे.
मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते.
संयम, भक्ती आणि सात्त्विक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
चातुर्मासाच्या प्रारंभामुळे जप, तप, दान आणि धर्माचरणाचे महत्त्व अधिक वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान विष्णूंची कृपा मिळावी, पापांचा नाश व्हावा आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून आषाढी एकादशीला उपवास केला जातो.
Ans: पौराणिक कथेनुसार, एकादशी देवीने मृदूमान्य दैत्याचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंनी या दिवशी उपवास करणाऱ्यांना पुण्यप्राप्तीचे वरदान दिले.
Ans: या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी पूर्ण करतात. हा वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो.






