Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारावी बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर फुटला; परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर पेपर झाला व्हायरल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड (Maharashtra Board Exam) बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. कॉपीमुक्त परीक्षा हे धोरण परीक्षा विभागाकडून राबविले जात आहे. असे असताना आता बारावी बोर्ड परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर फुटला (HSC Maths Paper Leaked) आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2023 | 02:27 PM
बारावी बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर फुटला; परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर पेपर झाला व्हायरल
Follow Us
Follow Us:

परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड (Maharashtra Board Exam) बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. कॉपीमुक्त परीक्षा हे धोरण परीक्षा विभागाकडून राबविले जात आहे. असे असताना आता बारावी बोर्ड परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर फुटला (HSC Maths Paper Leaked) आहे. आज होणाऱ्या परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. हा गणित विषयाचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा सुरु आहे.

बारावी बोर्ड परीक्षेच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये चुका झाल्याचे आढळून आले होते. तसेच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. असे असतानाच आता बारावीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. परीक्षेपूर्वी पेपरचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा गणिताचा पेपर कोणी फोडला ? पेपर व्हायरल करण्यामागे कोण? यामागे काही सक्रिय रॅकेट आहे का? त्यादृष्टीने तपासणी केली जात आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या इंग्रजीच्या पेपरनंतर आता गणिताच्या पेपरमध्ये नवा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. पेपरफुटीला अद्याप बोर्डाच्या सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असताना, शिक्षकच या मोहिमेला अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्यानंतर हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. हिंदी विषयाच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचा देण्यात आला होता. या गोंधळातच गणिताचा पेपर फुटल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Hsc maths paper leaked in parbhani maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2023 | 02:27 PM

Topics:  

  • board exam
  • maharashtra

संबंधित बातम्या

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात
1

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
2

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका
3

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
4

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.