कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल
कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील अतिक्रमणे नेरळ गावात करण्यात आलेल्या उपोषणानंतर काढण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कडून दोन दिवस अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली जात आहे. 01 आणि 02 ऑक्टोबर रोजी अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली असून अजूनही कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत अन्यथा आम्हाला देखील उपोषण करावे लागेल असा इशारा नेरळ ग्रामपंचायचे माजी सदस्य संजीवनी हजारे यांनी दिला आहे.
उपोषणकर्त्यांची मागणी कर्जत कल्याण रस्त्यावरील नेरळ विद्या मंदिर शाळा ते नेरळ पेट्रोल पंप या भागातील रस्त्याच्या जागेत असलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी होती.या मागणीनुसार एक आणि 02 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने कारवाई करण्यात आली. मात्र आज तिसऱ्या दिवशी ही कारवाई बंद झाली असून नेरळ जकात नाका पासून ते नेरळ पेट्रोल पंप या भागातील अतिक्रमणे कायम आहेत.
नेरळ मध्ये सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेले गटार ही सीमा निश्चित करण्यात आली होती. यानंतर रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटर अंतर निश्चित करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली, तर ही कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
येथील एकवीरा हॉटेलच्या मालक संजीवनी हजारे यांनी या कारवाई बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.नेरळ पोलीस ठाणे आणि त्या पुढील शाळा यांचे कुंपण कायम ठेवले आहे.तसेच जकात नाका पासून पुढे वन विभागाचे कारण दाखवून काही अतिक्रमणे तोडली नाहीत.तर एल ए इ एस शाळेजवळ रस्त्याच्या आजुबाजूला अतिक्रमणे आहेत. यांना 12 मीटरचा दंडक कधी वापरणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर धनाजी गरुड यांनी आमच्या मालकी जागेतील बांधकाम रस्त्याच्या जागेत आहेत म्हणून त्यातील ती बांधकामे 12 मीटरच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध आम्ही न्यायालयात जाऊन करणार व नुकसान भरपाई मागणार आहोत अशी माहिती धनाजी गरुड यांनी दिली आहे.
या कारवाईत नेरळ पोलिस ठाण्याची रस्त्याला अगदी लागून असलेली भिंत तोडली नाही. तसेच रस्त्याच्या बाजूला एक शाळेचे कुंपण देखील तसेच आहे; ही बाब गंभीर असून आम्ही ते बांधकाम तोटले पाहिजेत आणि सर्वांना एक न्याय असावा म्हणून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मंदिरासमोरील शेड हटवले; पण या भागात गजानन महाराज यांचे मंदिर आहे, ते मंदिर 12 मीटरच्या बाहेर होते. पण शेड रस्त्याच्या जागेत येत असल्याने मंदिराचे व्यवस्थापन यांनी ते शेड स्वतःहून बाजूला काढले आहे.
नेरळ बाजार पेठ मध्ये शासनाने करोडो रुपये खर्चून बांधलेले रस्त्याच्या बाजूचे फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले आहे.त्यांच्यावर हातोडा फिरला नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार असा निर्धार अनेक नेरळ कर यांनी जाहीर केला आहे.






