Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान १० दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने १० दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी सांगितले.

  • By Aparna
Updated On: Jan 29, 2024 | 09:09 PM
Ajit Pawar

Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर : कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान १० दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने १० दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी सांगितले.अजित पवार आज  कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी  सकाळी गंगावेश तालमीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असेही त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सरकारची कोणतीही मिलीभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. घरातील दोन भावांमध्ये देखील वाद होतात मात्र त्यावर बसून मार्ग काढतात. मराठा आरक्षणबाबत काही जणांना हे थांबावं असं वाटत नसावं. म्हणून जण काही जण बोलत असतील त्यांना वेदना होत असतील. हा असा म्हटला तो तसा म्हटला या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, असे म्हणत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
मराठ्यांना देण्यात आलेल्या अध्यादेशावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काल प्रफुलपटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं आहे. मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, मुंबईत गेल्यावर बोलीन, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काही काम राहिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केलं आहे. विरोधकांमध्ये एकी राहिली नाही ममता बॅनर्जी ,अखिलेश यादव हे आता वेगळी भूमिका मांडत आहेत. विरोधकांनी टीकाटिप्पणी करत बसावं आम्ही आमचे काम करत राहणार असल्याचे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावर, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, आदी उपस्थित होते.

Web Title: I am not bound to answer the question of the talkative people deputy chief minister ajit pawar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2024 | 07:48 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news
  • kolhapur
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही
1

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
2

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक
3

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Maharashtra Politics: “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य
4

Maharashtra Politics: “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.