Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना! २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला; महिलेसह चार जण जखमी

मिरा-भाईंदरमधील काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या चाळीच्या घरावर पडल्याने महिलेसह चार जण जखमी झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 11:40 AM
मिरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना! २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला; महिलेसह चार जण जखमी

मिरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना! २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला; महिलेसह चार जण जखमी

Follow Us
Follow Us:
  • २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला
  • काशीमीरात निर्माणाधीन इमारतीवरून पेव्हर ब्लॉक पडला
  • चाळीच्या घराचे छत फोडून चार जण जखमी
  • मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा फटका
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी (6 जुलै 2026) काशीमीरा परिसरात एक गंभीर दुर्घटना घडली. मीरा गावठाण येथील निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या श्री हरिधाम वेल्फेअर सोसायटीच्या चाळीतील घरावर आदळला. या दुर्घटनेत घरात झोपलेल्या एका महिलेसह चार जण जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासूनच काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा तडाखा सुरू होता. त्याचदरम्यान निर्माणाधीन इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठेवलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक अचानक खाली कोसळला. हा ब्लॉक थेट लगतच्या चाळीच्या पत्र्याच्या छताला फोडून घराच्या आतील भागात पडला. त्या वेळी घरातील सदस्य झोपेत असल्याने त्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.

Karjat Lonavala Landslide: मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब

दुर्घटनेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.या दुर्घटनेत प्रियंका सतीश चौबे, सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी प्रियंका सतीश चौबे यांच्यावर ऑर्बिट रुग्णालयात, तर सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर काशीमीरा पोलीस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. निर्माणाधीन इमारतीवरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येत असून, नेमका पेव्हर ब्लॉक कशामुळे खाली पडला याचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वर ठेवलेले बांधकाम साहित्य सैल होऊन खाली पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या काळात उंच इमारतींवर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगत संबंधित बिल्डर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच संबंधित बांधकाम प्रकल्पातील सुरक्षाव्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Rain Alert: शाळांना रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर!

Web Title: Mira bhayandar kashimira paver block falls under construction building four injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प
1

मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प
2

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई
3

पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

Mumbai Rain : ‘सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना…’, IMD चा रेड अलर्ट; ९० किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा, WFH चे निर्देश
4

Mumbai Rain : ‘सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना…’, IMD चा रेड अलर्ट; ९० किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा, WFH चे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.