I Love Muhammad write on Ahilyanagar Road muslim community aggressive
I Love Mohammed on Ahilyanagar Road : अहिल्यानगर : कोटला गावामध्ये जातीय वाद निर्माण होऊन परिस्थिती चिघळली आहे. अहिल्यानगर-संभाजी नगर रोडवरील कोटला गावात जमाव जमला असून मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहिण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. अज्ञात व्यक्तीने “आय लव्ह मोहम्मद” असे लिहित रांगोळी काढली. यावरुन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार,कोटला गावामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी “आय लव्ह मोहम्मद” ही रांगोळी तयार केली होती. रस्त्यावर हे लिहिण्यात आल्यामुळे स्थानिक मुस्लिम समुदायाने रोष व्यक्त केला. ही रांगोळ म्हणजे पैगंबर मुहम्मद यांचा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळे मोठ्या संख्येने लोक पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यासाठी जमले होते. रास्ता रोको सुरु करण्यात आला. त्याचबरोबर आक्रमक मुस्लीम समाजाने महामार्ग देखील बंद केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे मोर्चाला सुरुवात झाली. अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने एकाला ताब्यात घेतलं आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रांगोळी काढणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली असून दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एक संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी रहिवाशांना समजावून सांगितले की त्यांनी या घटनेत आवश्यक ती कारवाई केली आहे. तरीही, काही अनियंत्रित घटक अशांतता निर्माण करत राहिले. पोलिसांनी शहरात सुरक्षा वाढवली आहे आणि नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की परिस्थिती शांततेत नियंत्रित करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जात आहेत. शहरातील रहिवाशांनी प्रशासनाच्या तत्पर प्रतिसादाचे कौतुक केले, परंतु या घटनांनी हे स्पष्ट केले की सामाजिक आणि धार्मिक संवेदनशीलतेचा आदर करणे अत्यंत महत्वाचे आहे. पोलिसांनी कोणत्याही अनुचित घटनेपासून नागरिक सुरक्षित राहतील याचीही खात्री केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार संग्राम जगताप यांनी मांडली भूमिका
या परिस्थितीवर आमदार संग्राम जगताप म्हणाले की, “अहिल्यानगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठान अनुष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडच आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या भागात ही दौड होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. सकाळच्यावेळी घटना घडली, एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. विनाकारण रास्ता रोको करण्याला अर्थ नाही. आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसताना, मागणी केली असती तर समजू शकतो. पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे” असं आमदार संग्राम जगताप म्हणाले. “पोलीस दाखल झालेले आहेत. कायदा कोणी हातात घेऊ नये. लोकशाही मार्गाने संविधानानुसार जे काही आहे ते होईल” असं संग्राम जगताप म्हणाले. “रास्ता रोको चालू होता. जे समाजकंटक आहेत, त्यांनी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. कोणी अफवांवर विश्वास ठेऊ नये” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.